‘बिग बॉस १९’मध्ये होणार ‘कोकण हार्टेड गर्ल’ची वाइल्ड कार्ड एन्ट्री? शेअर केला व्हिडिओ

Ankita Walawalkar | सलमान खानचा ‘बिग बॉस १९’ या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या आठवड्यात दुसऱ्या ‘वीकेंड का वार’मध्ये एक नवा वाइल्ड कार्ड स्पर्धक घरात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर बिग बॉसच्या दुसऱ्या आठवड्यात घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याचे म्हंटले जात आहे. यावर स्वतः अंकिताने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती म्हणते की, “नमस्कार मंडळी, जसे की तुम्हाला माहित आहे,’बिग बॉस’ हिंदीच्या घरात माझी वाइल्ड कार्ड एन्ट्री होत आहे. मी यासाठी खूपच उत्सुक आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या वेळी मी ‘बिग बॉस’ पाहिला नव्हता. पण यावेळी माझ्या पाठीशी अनुभव आहे.” Ankita Walawalkar |
View this post on Instagram
‘बिग बॉस मराठी’च्या घरात असताना तुम्ही मला जे प्रेम दिले, आशीर्वाद दिलेत. ते आताही माझ्याबरोबर राहू द्या. तुमचे हेच प्रेम आणि आशीर्वाद मला ट्रॉफीपर्यंत…” अंकिताचे बोलणे पूर्ण होणार तेवढ्यात कुणाल आणि अंकिताची बहिण तिथे येतात आणि तिला झोपेतून उठवतात. म्हणजे अंकिता ‘बिग बॉस’मध्ये जाण्याचं स्वप्न पाहत होती.
दरम्यान, अंकिता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तिला ‘बिग बॉस मराठी’मुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. तिने ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे चांगलेच गाजवले होते. Ankita Walawalkar |
हेही वाचा:
“देशाचा अपमान एवढ्या लवकर …” ; भारताविषयी ट्रम्पच्या “नव्या भूमिकेवर” शशी थरूर यांचे विधान





