गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेवासा पोलिसांचा ‘रूट मार्च’

नेवासा – नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यातील 4 पोलीस अधिकारी, 30 पोलीस अंमलदार आणि 35 होमगार्ड यांनी संयुक्तीकरित्या नेवासा शहरातील गणपती चौक, वाखुरे चौक, लोखंडे गल्ली, खाटीक मोहला, गणपती मंदिर, हनुमान मंदिर, मोहिनीराज, औदुंबर चौक या मार्गावरील दाट लोकवस्तीतून शिस्तबद्धरीत्या रूट मार्च काढण्यात आला.
गणेशोत्सव काळात सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वासाचे आणि सुरक्षेचे वातावरण तसेच सुरक्षितेची भावना व गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचा धाक निर्माण होण्यासाठी या रूट मार्चचे आयोजन नेवासा पोलीसांनी केले.
शहरातून काढण्यात आलेल्या या रूट मार्चचा सकारात्मक परिणाम यावेळी दिसून आला. नेवासा पोलीसांनी काढलेल्या या रूट मार्चने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने काढलेल्या रूट मार्चचे कौतुक जनतेने करुन जनतेच्या मनात सुरक्षेची भावना यावेळी निर्माण झालेली होती.





