Nevasa News : नेवाश्यात ‘एक कॉल, चहा ऑन द स्पॉट’; अर्जुन पवार यांच्या झटपट सेवेला नागरिकांची पसंती
Nevasa News : नेवासे शहरात एका मराठी तरुणाने पारंपरिक चहाच्या व्यवसायाला आधुनिक सेवेची जोड देऊन थेट 'चहा ऑन कॉल' सेवा सुरू केली आहे. '

Nevasa News : ऑनलाइन सेवांच्या वाढत्या युगात आता फक्त मोठ्या ई-कॉमर्स कंपन्याच नाही, तर स्थानिक व्यावसायिकही ग्राहकांच्या गरजा ओळखून नवे प्रयोग करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे शहरात एका तरुणाने याच संकल्पनेतून चहाचा व्यवसाय वेगळ्या पद्धतीने उभा केला आहे. ‘एक फोन करा आणि काही मिनिटांत गरमागरम चहा तुमच्या दारात’ अशी सेवा देत अर्जुन पवार यांनी ग्राहकांची मने जिंकली आहेत. (Nevasa News)
नेवासे शहरातील विखोना पेट्रोल पंपासमोरील बालाजी कॉम्प्लेक्स येथे अर्जुन पवार यांचे चहाचे हॉटेल आहे. ग्राहकांकडून मोबाईलवर ऑर्डर मिळताच ते स्वतः मोटारसायकलवरून थेट ग्राहकांच्या ठिकाणी चहा पोहोचवतात. शहरासह दोन ते चार किलोमीटर परिसरात ही सेवा उपलब्ध असल्याने कार्यालये, दुकाने आणि व्यावसायिकांकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. (Nevasa News)
झटपट आणि दर्जेदार सेवा हेच अर्जुन पवार यांच्या व्यवसायाचे वैशिष्ट्य ठरले आहे. त्यामुळे अनेक ग्राहक आता हॉटेलमध्ये जाण्याऐवजी थेट फोनवरून चहाची ऑर्डर देण्यास प्राधान्य देत आहेत. गुणवत्तापूर्ण चहा आणि वेळेवर सेवा यामुळे त्यांच्या ग्राहकसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. (Nevasa News)
स्पर्धेच्या युगात ग्राहकांच्या बदलत्या गरजा ओळखून अर्जुन पवार यांनी पारंपरिक चहाच्या व्यवसायाला आधुनिक सेवेची जोड दिली आहे. या अभिनव उपक्रमामुळे त्यांचा व्यवसायही चांगला वाढला असून, स्थानिक स्तरावर उद्योजकतेचा एक प्रेरणादायी आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. (Nevasa News)
Nevasa News : देवगड दर्शनासाठी निघालेल्या अंगणवाडी सेविकेचे अपहरण; मारहाण करून 96 हजारांचा ऐवज लुटला





