गौतम बुद्धांच्या विचारांचे पाईक होण्याची गरज – संजय आण्णा सातव

हडपसर | गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापन आणि प्रसार केला आज भारताशिवाय जगभरात बौद्ध धर्माचे अनेक उपासक आहेत. त्यांच्या शिकवणीला, विचारांना, ज्ञानाला उजाळा देण्यासाठी ‘बौद्ध पौर्णिमा’ साजरी केली जाते. त्यानिमित्ताने आपणही त्यांच्या विचारांचे पाईक होण्याची गरज आहे, असे मत हडपसर विधानसभा भाजपा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष संजय आण्णा सातव यांनी व्यक्त केले.
प्रभाग क्रमांक 26 मध्ये संजय आण्णा सातव व गेणुजी फाऊंडेशन यांच्या वतीने जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध जयंती जनसंपर्क कार्यालय येथे साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी संजय सातव, उमेश आल्हाट, महेश दादा सातव,अनिल वाडकर, संजय भुजबळ, संकेत सोनवणे, बाळु शिवरकर, बाप्पू मिरेकर, कुलकर्णी गुरुजी, देशपांडे गुरुजी, विशाल तोडकर, सागर कुंजीर, आकाश एडके, मंगेश अरगडे, इक्बाल शेख, अश्विनी हिप्परगी,मोहिनी भोकरे, निकीता टाकळे, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये जयंती साजरी करण्यात आली.





