महत्वाची बातमी ! भाजप बनला राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष ; राज्यसभेतील 12 जागांचे उमेदवार बिनविरोध

NDA Crosses Majority Mark । राज्यसभेतून मोठी बातमी समोर आली आहे.राज्यसभेमध्ये आता भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. कारण एनडीएचे 11 सदस्य राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. त्यामुळे राज्यसभेतील एनडीएचे सदस्य संख्या आता 115 वरती गेली आहे. 96 सदस्यासह भाजप राज्यसभेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
एनडीए आघाडीकडे आता पूर्ण बहुमत NDA Crosses Majority Mark ।
राज्यसभेच्या 12 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. 12 पैकी एनडीए (NDA)ला 11 जागांवर विजय मिळाला असून एका जागेवर काँग्रेसने विजय मिळाला आहे. त्यामुळे आता राज्यसभेत भाजपच स्थान आणखी मजबूत झालं आहे. एनडीए आघाडीकडे आता पूर्ण बहुमत आहे. आता राज्यसभेत कोणतही विधेयकं मंजूर करुन घेताना मोदी सरकाला फार अडचणी येणार नाहीत. आता मोदी सरकारकडे मोठं बहुमत आहे.
राज्यसभेच्या 12 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. त्या 12 जागांमध्ये भाजपाचे 9 आणि सहकारी पक्षाचे 2 सदस्य यांची बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेसकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी राज्यसभेची निवडणूक जिंकली आहे. राजस्थानमधून भाजपाचे रवनीत सिंह बिट्टू, हरियाणामधून किरण चौधरी, मध्य प्रदेशातून जॉर्ज कुरियन आणि बिहारमधून मनन कुमार मिश्रा यांची बिनविरोध निवड झाली आहे. बिहारमधून एनडीएचा भाग असलेल्या राष्ट्रीय लोक पार्टीचे नेते उपेंद्र कुशवाहा देखील विजयी झाले आहेत.
कोणत्या पक्षाची किती संख्या? NDA Crosses Majority Mark ।
राज्यसभेत भाजपाचे 9 उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आता त्यांची संख्या 96 वरती पोहोचली आहे. सहकारी घटक पक्षांचे 16 खासदार अशी राज्यसभेत एनडीएची संख्या 112 इतकी झाली आहे. 6 मनोनीत आणि एका अपक्षाच्या समर्थनाने बहुमताचा आकडा गाठला आहे. बुहमताचा आकडा गाठण्यासाठी 119 सदस्यांची गरज असते.
आता NDA ला कोणतही विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी बीजेडी, YSR काँग्रेस, बीआरएस आणि AIADMK वर अवलंबून राहावे लागणार नाही. जेडी(यू), एनसीपी, जेडी(एस), आरपीआय(ए), शिवसेना, आरएलडी, आरएलएम, एनपीपी, पीएमके, तमिल मनीला काँग्रेस आणि यूपीपीएल हे पक्ष NDA सोबत आहेत.





