Jyoti Waghmare : ‘डोकं ठिकाणावर आहे का?’ हर्षवर्धन सपकाळांच्या त्या मागणीवर ज्योती वाघमारेंचा जोरदार पलटवार!
Jyoti Waghmare : हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी ऐकूण त्यांच्या बैद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असा शब्दांत ज्योती वाघमारे यांनी त्यांच्यावर पलटवार केला.

या प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या अटकेची मागणी केली. त्यांच्या या मागणीवरुन शिवसेनेच्या (शिंदे गट) खासदार ज्योती वाघमारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
हर्षवर्धन सपकाळ यांची काय मागणी?
‘मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची ईडी चौकशी करा! ऑडिओमध्ये नाव असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांना अटक करा! ५०० कोटी रुपये कुठून आले, कोणी आणले, कोणाला दिले, याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणा!’ असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. अशा प्रकारची मागणी करणे म्हणजे अकलेचे स्पष्ट दिवाळे निघाल्याचे थेट लक्षण आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी ऐकूण त्यांच्या बैद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत अशा शब्दांत ज्योती वाघमारे यांनी त्यांच्यावर पलटवार केला.
ज्योती वाघमारेंचा सपकाळांवर निशाणा
कथित अॅाडिओ क्लिपवरुन थेट अटकेच्या मागणीवर बोलताना ज्योती वाघामारे म्हणाल्या “ऑडिओ क्लिपच्या आधारावर अटक करा म्हणणे हा कसला बालिशपणा, मनोज जरांगे यांनी जी ऑडिओ क्लिप ऐकवली आहे, त्यामध्ये तिसरीच अज्ञात व्यक्ती श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल अफवा पसरवत आहे. कोणताही पुरावा न देता फक्त एका कथिक ऑडिओ क्लिपच्या आधारे थेट अटकेची मागणी करणे चुकीचे आहे. सपकाळ यांचं डोकं ठिकाणावर आहे का? असे ज्योती वाघमारे यांनी म्हटले आहे.
कथित ऑडिओ क्लिपमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग
या कथित ऑडिओ क्लिपमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांकडून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली जात असताना शिंदे गटातील नेत्यांनीही क्लिपमधील दाव्यांची सत्यता तपासण्याची मागणी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे आता या कथित ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळण्यासाठी चौकशी केली जाणार का आणि या प्रकरणावर सरकारची भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Phaltan: आर्थिक शिस्तीसह संस्थेची प्रगती राखण्याची जबाबदारी, रणजितसिंह नाईक निंबाळकर





