NCP Merger : मोठी बातमी! शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार? सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने खळबळ
NCP Merger : महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात एका अत्यंत मोठ्या आणि संभाव्य 'महा-विलिनीकरणाची' जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

NCP Merger : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे भवितव्य आणि काँग्रेससोबत संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या एका सूचक विधानामुळे नवे बळ मिळाले आहे. (NCP Merger)
शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या प्रादेशिक पक्षांनी पुन्हा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे, अशी भूमिका मांडल्यानंतर त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. (NCP Merger)
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “संजय राऊत माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत. त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा मी आदर करते. त्यांनी चांगला विचार मांडला आहे. मात्र हे सर्व कधी, कसे आणि कोणत्या स्वरूपात घडेल, हे येणारा काळच ठरवेल.” त्यांच्या या वक्तव्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (NCP Merger)
संजय राऊत यांनी काय मांडला प्रस्ताव? (NCP Merger)
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत यांनी देशातील विरोधी पक्षांच्या एकीची गरज अधोरेखित केली. काँग्रेसच्या विचारधारेतून निर्माण झालेले अनेक प्रादेशिक पक्ष आजही भाजपविरोधी राजकारण करत आहेत. (NCP Merger)
त्यामुळे अशा पक्षांनी पुन्हा काँग्रेससोबत एकत्र येऊन राष्ट्रीय स्तरावर मजबूत पर्याय उभा करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह इतर समविचारी पक्षांनी पुढाकार घ्यावा आणि या प्रक्रियेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नेतृत्व करावे, अशी अपेक्षाही राऊत यांनी व्यक्त केली. (NCP Merger)
तृणमूल काँग्रेसच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया (NCP Merger)
तृणमूल काँग्रेसमधील राजकीय घडामोडींवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली. “आधी शिवसेना फोडली, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली आणि आता तृणमूल काँग्रेसलाही लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे आम्ही तृणमूल काँग्रेससोबत ठामपणे उभे आहोत,” असे त्या म्हणाल्या. (NCP Merger)
राजकीय चर्चांना वेग
सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाबाबत कोणतेही स्पष्ट संकेत दिले नसले तरी त्यांनी राऊतांचा प्रस्ताव पूर्णपणे फेटाळून लावला नाही. त्यामुळे आगामी काळात विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी काही मोठे राजकीय निर्णय होऊ शकतात का, याकडे राज्यासह देशाच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे. सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या चर्चांना सुळे यांच्या वक्तव्यामुळे नवे बळ मिळाल्याचे चित्र आहे. (NCP Merger)





