Maharashtra Politics : मोठा राजकीय भूकंप! शरद पवार गटाचे २ माजी नगराध्यक्षांसह ११ नगरसेवक शिवसेनेत
Maharashtra Politics : जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला (NCP SP) फार मोठा राजकीय धक्का बसला आहे.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेला पुन्हा एकदा जोर आला असतानाच भुसावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेतील दोन माजी नगराध्यक्षांसह तब्बल 11 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. (Maharashtra Politics)
मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशामुळे भुसावळच्या स्थानिक राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Politics)
दोन माजी नगराध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश
भुसावळमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी आणि माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर भुसावळ नगरपालिकेतील शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या पक्षांतराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. (Maharashtra Politics)
गायत्री भंगाळेंची राजकीय वाटचाल चर्चेत
गायत्री भंगाळे यांच्या शिवसेना प्रवेशाची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा होत आहे. 2025 मध्ये झालेल्या भुसावळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव करत नगराध्यक्षपद मिळवले होते. (Maharashtra Politics)
मात्र, त्यानंतर त्यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत आला. जात पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर त्यांना नगराध्यक्षपदावरून अपात्र ठरावे लागले. या पार्श्वभूमीवर आगामी राजकारणात आपली राजकीय भूमिका मजबूत करण्यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Maharashtra Politics)
शरद पवार गटातील 11 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत
गायत्री भंगाळे आणि अनिल चौधरी यांच्या प्रवेशानंतर त्यांच्या पुढाकाराने भुसावळ नगरपालिकेतील 11 नगरसेवकांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये गटनेते सचिन संतोष चौधरी, इक्बाल दिलनवाज शेख, उल्हास भीमराव पगारे, सुभद्रा गुंजाळ, अमीन कुरेशी, शेख नसीब शेख नदीम, सचिन भास्कर पाटील, अकील नादर पिंजारी, शबाना बी. सिकंदर खान, पुष्पा कैलास चौधरी आणि सुनीता कृषधनकर यांचा समावेश आहे. या सामूहिक पक्षांतरामुळे भुसावळ नगरपालिकेतील राजकीय गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Maharashtra Politics)
सामाजिक कार्यकर्त्यांचाही पक्षप्रवेश
नगरसेवकांसोबतच काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. सिकंदर खान, नदीम सरकार, इसाक बागबान, ओमप्रकाश झा, गिरीश पारधी, महेंद्र चौधरी, नरसिंह तायडे, अनिकेत झा, नचिकेत मंदवाळे, आरिफ खान आणि आरिफ शेख यांच्यासह इतर कार्यकर्ते शिवसेनेत सहभागी झाले. (Maharashtra Politics)
‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेला पुन्हा जोर
राज्यात विरोधी पक्षांतील नेत्यांना आपल्या गटात आणण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. याला राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ असे संबोधले जात आहे. भुसावळमध्ये शरद पवार गटातील दोन माजी नगराध्यक्ष आणि 11 नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. (Maharashtra Politics)
भुसावळमध्ये नवे राजकीय समीकरण?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. एकाचवेळी दोन माजी नगराध्यक्ष आणि 11 नगरसेवकांनी पक्ष बदलल्याने भुसावळच्या राजकारणात सत्तासमीकरणे बदलण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics)
आता या पक्षांतराचा आगामी स्थानिक राजकारणावर नेमका किती परिणाम होतो आणि भुसावळमध्ये कोणत्या पक्षाची ताकद वाढते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : महायुतीत मोठा भडका? भाजप आक्रमक; थेट युतीतून बाहेर पडण्याचा दिला इशारा






