Maharashtra Politics : मोठी बातमी..! राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराला राजीनामा देण्याच्या सूचना? स्वतःचं दिलं स्पष्टीकरण
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदाराच्या राजीनाम्याची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार इद्रीस नायकवडी (Idris naikwadi) यांच्या राजीनाम्याच्या चर्चेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यपाल कोट्यातून निवडून आलेल्या नायकवडी यांना पक्षाकडून राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. (Maharashtra Politics)
ओएसडीने भेट घेतल्याची चर्चा (Maharashtra Politics)
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 15 दिवसांपूर्वी एका मंत्र्यांच्या ओएसडीने नायकवडी यांची भेट घेतली होती. त्यावेळी राजीनाम्याबाबत संदेश देण्यात आल्याचे सांगितले जात होते. इतकेच नव्हे तर राजीनाम्याचा नमुनाही सोबत आणण्यात आल्याची चर्चा होती. राष्ट्रवादीतील युवा नेतृत्वाला त्यांचा राजीनामा हवा असल्याचेही या वृत्तात म्हटले गेले. (Maharashtra Politics)
माझ्याकडे कोणतीही मागणी आलेली नाही : नायकवडी (Maharashtra Politics)
या सर्व चर्चांवर आता स्वतः इद्रीस नायकवडी यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, पक्षातील काही लोकांकडून अशा वावड्या उठवल्या जात आहेत. काहींच्या इच्छा पूर्ण झाल्या नसाव्यात, त्यामुळे ते अपेक्षा करत असतील. मात्र माझ्याकडे पक्षाकडून राजीनाम्याची कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही. (Maharashtra Politics)
ओएसडी भेटीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मी आमदार आहे. माझ्याकडे अनेक ओएसडी येत असतात. परस्पर चर्चा घडवत असतील, पण माझ्यापर्यंत असा कोणताही अधिकृत निरोप आलेला नाही. (Maharashtra Politics)
2030 पर्यंत कार्यकाळ
इद्रीस नायकवडी यांची 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर निवड झाली होती. त्यांचा कार्यकाळ 2030 पर्यंत आहे. ते यापूर्वी सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे महापौर राहिले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्षही आहेत. (Maharashtra Politics)
बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक उद्या होणार असून या बैठकीत नायकवडी यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)





