NCB Drug Raids : ‘आर्यन खान’ला ताब्यात घेताच समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया; पहा काय म्हणाले…

मुंबई – मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर कारवाई करत अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे यामध्ये बॉलीवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा ‘आर्यन खान’चा सुद्धा समावेश आहे.
सध्या या सर्वांची एनसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे.
समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी चौकशी सुरु असलेल्यांची नावं जाहीर केली असून आर्यन खानच्या नावाला दुजोरा दिला आहे.
#UPDATE | Children of prominent Bollywood actors being investigated, according to NCB officials
— ANI (@ANI) October 2, 2021
आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रम छोकेर, गोमित चोप्रा यांची क्रूझ पार्टी रेव्ह प्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे. हे जहाज मुंबईतून गोव्याकडे जात होते. मात्र या जहाजावर एनसीबीने छापेमारी करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत.
#UPDATE | We’ve intercepted some persons. The probe is underway. Drugs have been recovered. We’re investigating 8-10 persons: Sameer Wankhede, Zonal Director, NCB, Mumbai
“I can’t comment on it”, says Wankhede on being asked, “Was any celebrity present at the party?” pic.twitter.com/BxBOODT0wg
— ANI (@ANI) October 2, 2021
या प्रकरणात ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्लीतील ड्रग तस्कर आहेत. प्रत्येक व्यक्तीने या पार्टीत प्रवेशासाठी 80 हजार रुपयांपेक्षा जास्त फी भरली होती. अशी माहिती अधिकारी समीर वानखेडे यांनी दिली.





