नवाजुद्दीन सिद्दीकी नेहा शर्मा दिसणार सोबत ! जुगाडू ‘जोगिरा सा रा रा’चा भन्नाट कॉमेडी टीजर एकदा पहाचं VIDEO

मुंबई – बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी शेवटचा ‘हीरोपंती’ चित्रपटात दिसला होता. यानंतर नावाजने अनेक सिरीज आणि ओटीटी चित्रपटांमध्ये कामे केली. लवकरच नवाज एका कौटुंबिक कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. ज्यामध्ये त्याच्या सोबत नेहा शर्मा मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. ‘जोगिरा सा रा रा’ असं या चित्रपटाचं नाव असून नवाजने याचा कॉमेडी टीजर शेअर केला आहे.
‘जोगिरा सा रा रा’ हे नावच युनिक असल्यामुळे यात नवाजचं कोणतं वेगळेपण पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कौटुंबिक कॉमेडी चित्रपटाचा टीझर रिलीज करताना नवाजुद्दीनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुम्हा सर्वांना ईद मुबारक. ट्विस्ट आणि टर्नने भरलेला एक स्वच्छ कौटुंबिक विनोदी चित्रपट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
नवाजुद्दीनने पुढे लिहिले की, ‘आमच्या आगामी ‘जोगिरा सा रा रा’ चित्रपटाचा अधिकृत टीझर आता रिलीज झाला आहे.’ या चित्रपटात नवाज जुगाडू जोगी प्रतापच्या भूमिकेत दिसणार आहे. तर नेहा शर्मा त्याची गर्लफ्रेंड डिंपलची भूमिका साकारणार आहे. ‘जोगिरा सा रा रा’चा टीझर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नवाजचे चाहते कमेंट करून चित्रपटाबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
‘जोगिरा सा रा रा’ हा चित्रपट १२ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन कुशन नंदी यांनी केले आहे. या चित्रपटाची पटकथा गालिब असद भोपाली यांनी लिहिली आहे. चित्रपटात नेहा शर्मा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याशिवाय संजय मिश्रा आणि महाक्षय चक्रवर्ती यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत.





