Pune Crime : नवले ब्रीज परिसरात देहविक्रयचा पर्दाफाश; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची धडक कारवाई
Pune Crime : आंबेगाव परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून उघडपणे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर अखेर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने छापा मारून मोठा पर्दाफाश केला आहे.

Pune Crime : नवले ब्रीज परिसरात मागील अनेक महिन्यांपासून राजरोजपणे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर अखेर अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाने कारवाई केली आहे. ९ मुलींची सुटका करीत दोघांना अटक केली आहे. (Pune Crime)
दरम्यान, संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणावर महिला, मुली, तृतीयपंथी रस्त्यावर उभा राहून अश्लील वर्तन करणे, नागरिकांना त्रास देण्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यासंदर्भात स्थानिकांनी वारंवार स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांची दखल घेण्यात येत नसल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. (Pune Crime)
राकेश राजु पाटोळे ( २७ रा. बेनकर चाळ, गणेशनगर, धायरी) मंगेश व्यंकट बनसोडे ( रा, गॅलेक्सी लॉज आंबेगाव, मुळ. धाराशिव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई २० जुलैला आंबेगाव बुद्रुक येथील बर्गर किंग जवळील साई किरण लॉज येथे करण्यात आली. (Pune Crime)
येथे महिलांकडुन वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्यापार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहकाच्या मदतीने खातरजमा केली. (Pune Crime)
त्यानंतर साई किरण व गॅलेक्सी लॉजमध्ये छापा टाकुन लॉजमध्ये मध्ये वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या ९ महिलांची सुटका केली. याप्रकरणी रिक्षा चालक राकेश पाटोळे, लॉज मॅनेजर मंगेश बनसोडे यांना अटक केली. ही कामगिरी गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ यांच्या पथकाने केली. (Pune Crime)
Pune Crime News : सराईत अल्पवयीन तरूणावर जीवघेणा हल्ला; १० ते १२ जणांकडून वार





