पुणे महापालिका आयुक्त पदाची नवल किशोर राम यांनी सूत्रे स्वीकारली
Updated On:

पुणे – महापालिका आयुक्त पदाचा पदभार नवल किशोर राम यांनी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या कडून स्वीकारला. डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
पुणे महापालिका आयुक्त पदावरून डॉ. राजेंद्र भोसले सेवानिवृत्त झाले आहे. त्यांच्या जागी राज्य शासनाकडून महापालिका आयुक्त म्हणून नवल किशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेत काम करण्याची उत्तम संधी मिळालेली आहे. त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त, उपआयुक्त व खातेप्रमुख उपस्थित होते.




