‘जीएसटी’तील तरतुदींविरोधात कर सल्लागारांचा देशव्यापी एल्गार
Updated On:

पुणे – केंद्र सरकराने लागू केलेल्या वस्तू व सेवा करातील (जीएसटी) जाचक अटी, तरतुदीविरोधात देशभरातील कर सल्लागार, व्यापारी, सनदी लेखापाल व संबंधित घटक एकवटले असून,
त्याविरोधात पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या समन्वयातून ‘ऑल इंडिया प्रोटेस्ट कमिटी’मार्फत देशव्यापी आंदोलन छेडण्यात आले आहे.
पुण्यातील कर सल्लागारांचे आंदोलन वाडिया कॉलेजजवळील जीएसटी (जुने एक्साईज ऑफिस) कार्यालयासमोर करण्यात आले.




