राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर कार्यालयात जल्लोष.! सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड

पुणे – जसा बारामतीचा विकास झाला, तसाचा बारामती लोकसभा मतदारसंघातील अन्य तालुक्यांचाही विकास करणे हेच माझे ध्येय आहे. त्यासाठी जनता मला बळ देईल, असा विश्वास व्यक्त करत केंद्रात चांगली संधी मिळाली तर नक्कीच चांगले काम करून दाखवेल असे मत नवनिर्वाचीत राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केले.
राज्यसभेच्या खासदारपदी सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली सुनेत्रा पवार यांचा सत्कार आणि जल्लोष करण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी त्या बोलत होत्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच केसरी वाड्यातील मानाचा गणपती आणि लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला देखील अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, आरपीआय आठवले गटाचे मंदार जोशी, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर,
खडकवासला विधानसभा अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ, वडगावशेरी विधानसभा सतीश म्हस्के, शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष अजय दराडे, दत्ताभाऊ सागरे, मुनीरभाइ सय्यद, शंतनू कुकडे, सदानंद शेट्टी, बाळासाहेब बोडके, प्रदीप गायकवाड, गौरी जाधव यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





