National Games 2023 (Tennis) : टेनिसमध्ये दुहेरीत महाराष्ट्राचा डबल धमाका

पणजी :- महाराष्ट्राच्या स्टार महिला टेनिसपटू ऋतुजा भोसले, प्रार्थना ठोंबरे यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिला दुहेरीत सुवर्णपदक पटकावले. या गटात पुरुष विभागात अर्जुन कढे आणि पूरव राजा या जोडीनेही सुवर्णपदकाला गवसणी घातली. महिला एकेरीत वैष्णवी अडकरला मात्र ब्रॉंझदकावर समाधान मानावे लागले.
महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात ऋतुजा आणि प्रार्थना जोडीने तेलंगणाच्या रश्मिका भमिडीपती आणि श्राव्या शिवानी जोडीवर 6-3, 6-1 असा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला.
#CWC2023 #INDvSA : कोहलीचं शतक, जडेजाचा ‘पंच’; भारताचा आफ्रिकेवर एकहाती विजय…
पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत अर्जुन-पूरव जोडीने कर्नाटकच्या आदिल कल्याणपूर आणि प्रज्ज्वल देव या जोडीवर 7-6, 6-3 असा विजय मिळवला. महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात वैष्णवीला गुजरातच्या वैदेही चौधरीकडून 6-0, 6-2 असा पराभव पत्करावा लागला.





