Australian Open 2026 : जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या आर्यना सबालेंकाने ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ (Australian Open 2026) च्या क्वार्टरफायनलमध्ये दमदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. मंगळवारी रॉड लेवर ॲरेनावर झालेल्या क्वार्टरफायनलमध्ये सबालेंकाने १८ वर्षीय अमेरिकन खेळाडू इवा जोविकला सरळ सेट्समध्ये ६-३, ६-० अशा स्कोअरने पराभूत केले. ही सबालेंकाची कारकीर्दीतील १४वी ग्रँड स्लॅम सेमीफायनल आहे आणि ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये (Australian Open 2026) ती सलग चौथ्यांदा सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. दोनदा चॅम्पियन असलेल्या सबालेंकाने पहिला सेट सुमारे एका तासात जिंकला. सामन्यादरम्यान उष्णता इतकी तीव्र होती की, सामना संपण्यापूर्वी स्टेडियमची छत बंद करावी लागली. सेमीफायनलमध्ये सबालेंकाचा सामना कोणाशी होणार? फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी सबालेंकाचा मुकाबला आता कोको गॉफ किंवा एलिना स्वितोलिना यांच्यापैकी एकाशी होईल. स्वितोलिनाने कोको गॉफला ६-१, ६-२ अशा स्कोअरने हरवले आहे. Australian Open 2026 पुरुष गटात ज्वेरेवचा विजय जागतिक क्रमवारीत तिसऱ्या नंबरवर असणाऱ्या जर्मनीच्या अलेक्जेंडर ज्वेरेवने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याने अमेरिकेच्या युवा खेळाडू लर्नर टिएनला चार सेटच्या कडक लढतीत ६-३, ६-७(५-७), ६-१, ७-६(७-३) अशा स्कोअरने पराभूत केले. रॉड लेवर ॲरेनावर झालेल्या या सामन्यात ज्वेरेवने पहिला सेट ६-३ ने जिंकला, पण दुसऱ्या सेटमध्ये टिएनने जबरदस्त कमबॅक केले आणि टायब्रेकमध्ये ७-५ ने सेट जिंकून सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या सेटमध्ये ज्वेरेवने वेगवान सर्व्हिस आणि दमदार ग्राउंड स्ट्रोक्सच्या जोरावर ६-१ ने सेट जिंकला. चौथा सेट टायब्रेकपर्यंत पोहोचला, जिथे ज्वेरेवने अनुभवाचा फायदा घेत ७-३ ने टायब्रेक जिंकला. भीषण उष्णतेमुळे बाह्य कोर्ट्सवरील सामने सस्पेंड मंगळवारी मेलबर्नमध्ये तापमान ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त पोहोचले. यामुळे आयोजकांना ‘एक्स्ट्रीम हीट पॉलिसी’ लागू करावी लागली. या पॉलिसीनुसार, बाह्य कोर्ट्सवरील सर्व सामने सस्पेंड करण्यात आले. मात्र, रॉड लेवर ॲरेना, मार्गारेट कोर्ट ॲरेना आणि जॉन केन ॲरेना या मुख्य स्टेडियम्समध्ये छत बंद करून इंडोअर कंडिशन्समध्ये सामने पूर्ण करण्यात आले. उष्णतेमुळे खेळाडूंना डिहायड्रेशन किंवा हीट स्ट्रेसचा धोका असतो, त्यामुळे टूर्नामेंटमध्ये ॲडव्हान्स सेंसर बसवलेले आहेत. हीट स्ट्रेस इंडेक्स ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास बाह्य कोर्ट्सवरील खेळ थांबवला जातो. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जानेवारी महिन्यातील उष्णता नेहमीच खेळाडूंसाठी आव्हान ठरते. सबालेंका आणि ज्वेरेव यांच्या विजयाने स्पर्धा अधिक रोमांचक झाली असून, सेमीफायनल आणि फायनलची उत्सुकता अजून वाढली आहे. हे पण वाचा : वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! U-19 वर्ल्डकपमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा फलंदाज