Nasrapur Case: सीसीटीव्हीमधील व्यक्ती मीच, पण…; नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपीचा धक्कादायक जबाब

Nasrapur Case: विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात आरोपीचा जबाब पूर्ण; सीसीटीव्ही फुटेजमधील स्वतःची ओळख अखेर केली मान्य.

Updated On:
Nasrapur Case: सीसीटीव्हीमधील व्यक्ती मीच, पण…; नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपीचा धक्कादायक जबाब

Nasrapur Case – नसरापूर येथे चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याचा शुक्रवारी (दि. १९) जबाब नोंदविण्यात आला. त्याला विचारलेल्या ८८ प्रश्नांना नाही, माहिती नाही, मुळीच नाही, अशी उत्तरे देत सर्व आरोप त्याने फेटाळले. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात हा जबाब नोंदविण्यात आला. याप्रकरणी १६ दिवसांत ५५ साक्षीदारांची साक्ष व उलटतपासणी झाली आहे. शुक्रवारी न्यायालयाने आरोपीस शाबीत झालेले सीसीटीव्ही फुटेज दाखविले.

सुरुवातीला त्याने हे फुटेज नाकारले. मात्र, झूम करून ६ ते ७ वेळा दाखविल्यानंतर सीसीटीव्हीतील व्यक्ती स्वतःच असल्याचे मान्य केले. मात्र, चिमुकली कोण, हे माहिती नसल्याचे सांगून बचावाचा प्रयत्न केला. न्यायालयाने विचारले, की घटनास्थळाकडे जाताना सोबत एक लहान मुलगी दिसत आहे. परतताना एकटाच दिसत आहे, त्या मुलीचे काय झाले? यावर सुरुवातीला त्याने आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर घटनेदिवशी साडेअकरा वाजता तो राम मंदिरात गेला होता.

तेथून तो घायवळांच्या शेडमध्ये गेला, तेव्हा तेथे मुलगी आली. तिला गाठीशेव दिली. तिला गोठ्यात नेताना आरोपी पाय घसरून पडल्याने मुलीच्या डोक्याला मार लागला व ती रडू लागली. त्यामुळे तिला कॉटवर झोपविले. लोक आरोप करतील म्हणून तिला तेथेच सोडून काळूबाई मंदिरात कट्ट्यावर जाऊन बसल्याचे त्याने सांगितले.

सरकारी वकील अजय मिसर, सहाय्यक ऍड. सुरेश गायकवाड व ऍड. प्रथमेश शिंगणे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे न्यायालयात हजर होते. आरोपीतर्फे ऍड. हिम्मतराव सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने, तपासी अंमलदार विजयमाला पवार आदी उपस्थित होते. मिसर यांनी अंतिम युक्तिवादासाठी उद्या (शनिवारी) तयार असल्याचे सांगितले. त्यास बचाव पक्षानेही होकार दिला.

आणखी संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यातील नामांकित संस्थेवर कारवाई! परवानगी न घेताच हलवली शाळा; संस्थापकासह दोघांवर गुन्हा

2026-09-11 05:15:28

Pune Crime: पुण्यातील नामांकित संस्थेवर कारवाई! परवानगी न घेताच हलवली शाळा; संस्थापकासह दोघांवर गुन्हा

Pune News : धक्कादायक ! पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीची आत्महत्या

2026-09-09 17:46:05

Pune News : धक्कादायक ! पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Pune Crime : रेल्वे पोलिसाचा गळा चिरून, डोक्यात दगड घालून जबरी चोरी; पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले

2026-09-08 19:55:45

Pune Crime : रेल्वे पोलिसाचा गळा चिरून, डोक्यात दगड घालून जबरी चोरी; पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले

Santosh Pandit : संतोष पंडितला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; वादग्रस्त रीलसाठी वापरलेला आयफोन, सीमकार्ड व ट्रायपॉड जप्त

2026-09-08 19:36:19

Santosh Pandit : संतोष पंडितला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; वादग्रस्त रीलसाठी वापरलेला आयफोन, सीमकार्ड व ट्रायपॉड जप्त

Crime : पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री ST बस अडवून 9 हजारांची लूट; चालक-वाहकाला मारहाण

2026-09-05 16:03:35

Crime : पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री ST बस अडवून 9 हजारांची लूट; चालक-वाहकाला मारहाण