Radhamohan Mishra Case: भोंदूबाबाचा आणखी एक काळा कारनामा; पेनड्राईव्हमध्ये सापडले ३५ जोडप्यांचे ‘ते’ खासगी व्हिडिओ

Radhamohan Mishra Case: १७ वर्षे इंजिनिअर तरुणीचे शोषण करणाऱ्या भोंदू बाबाच्या आश्रमातून तब्बल २३ पेनड्राईव्ह जप्त; ३५ जोडप्यांचे खासगी व्हिडिओ सापडल्याने खळबळ.

Updated On:
Radhamohan Mishra Case: भोंदूबाबाचा आणखी एक काळा कारनामा; पेनड्राईव्हमध्ये सापडले ३५ जोडप्यांचे ‘ते’ खासगी व्हिडिओ

Radhamohan Mishra Case – ईश्वराचा अवतार असल्याचा दावा करून महिला भक्ताचे मानसिक, आर्थिक आणि लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक केलेल्या कथित भोंदूबाबा राधामोहन मिश्रा (५९) याच्या आश्रमातून जप्त करण्यात आलेल्या डिजिटल साहित्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, बाबाने महिला भक्तांना त्यांच्या पतींसह खासगी क्षणांचे मोबाइलवर चित्रीकरण करून ते पेनड्राइव्हद्वारे स्वतःकडे पाठविण्यास भाग पाडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी आश्रमातून १२ लॅपटॉप, एक टॅब, ११ मोबाइल, १९ हार्डडिस्क, २३ पेनड्राइव्ह, डीव्हीडी, सीडी, साडेसहा लाखांची रोकड, सुमारे १५ लाखांचे दागिने, तसेच १० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जप्त केलेल्या २३ पेनड्राइव्हच्या प्राथमिक तपासात तब्बल ३५ जोडप्यांच्या खासगी क्षणांचे चित्रीकरण आढळल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. आता या व्हिडिओंतील व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे काम सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

यापूर्वी एका संगणक अभियंता तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीत, मिश्रा याने स्वतःला दैवी शक्तीचा अवतार असल्याचे भासवून तब्बल १७ वर्षे तिचे लैंगिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. विजेचे शॉक देणे, अमानुष वागणूक देणे आणि तिची मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीनंतर तपासाचा विस्तार होत असून, नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत.

भुयार खोदण्याचा डाव?
नाशिकमधील कथित भोंदूबाबा प्रकरण उघडकीस आल्यानंतर मिश्रा सावध झाला होता. स्वतःवर कारवाई झाल्यास आश्रमातून पळून जाण्यासाठी भुयार तयार करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मात्र, त्याआधीच पोलिसांनी कारवाई करून त्याला अटक केली. या भुयाराच्या कामाबाबतही पोलीस अधिक तपास करत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Fake Liquor Racket: नकली दारूच्या धंद्याचा ‘मास्टरमाईंड’ कोण? आळेफाटा-माळशेज परिसरात मोठी साखळी...'हप्ता' वसुलीचे आरोप

2026-09-11 03:30:30

Fake Liquor Racket: नकली दारूच्या धंद्याचा ‘मास्टरमाईंड’ कोण? आळेफाटा-माळशेज परिसरात मोठी साखळी...'हप्ता' वसुलीचे आरोप

Santosh Pandit Arrested: सोशल मीडियावर 'हा' व्हिडिओ पडला महाग! मंत्र्यांवर शेरेबाजी करणाऱ्या संतोष पंडितला अटक

2026-09-04 05:45:02

Santosh Pandit Arrested: सोशल मीडियावर 'हा' व्हिडिओ पडला महाग! मंत्र्यांवर शेरेबाजी करणाऱ्या संतोष पंडितला अटक

Dharashiv News : धाराशिव हादरलं ! नळदुर्ग किल्ल्यावरून आईने मुलांसह उचलले टोकाचे पाऊल; माय-लेकाचा करुण अंत

2026-09-03 18:58:34

Dharashiv News : धाराशिव हादरलं ! नळदुर्ग किल्ल्यावरून आईने मुलांसह उचलले टोकाचे पाऊल; माय-लेकाचा करुण अंत

Digital Arrest Case : डिजिटल अरेस्टच्या भीतीने ज्येष्ठाची 10 कोटींची फसवणूक; आरोपीला अखेर जामीन

2026-08-25 21:40:24

Digital Arrest Case : डिजिटल अरेस्टच्या भीतीने ज्येष्ठाची 10 कोटींची फसवणूक; आरोपीला अखेर जामीन

Cyber Crime : ऑनलाइन गेमिंग-बेटिंगच्या नावाखाली 125 कोटींची उलाढाल; ‘म्युल अकाउंट’ रॅकेटचा पर्दाफाश

2026-08-20 22:13:45

Cyber Crime : ऑनलाइन गेमिंग-बेटिंगच्या नावाखाली 125 कोटींची उलाढाल; ‘म्युल अकाउंट’ रॅकेटचा पर्दाफाश