Pune News : धक्कादायक ! पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीची आत्महत्या
डॉक्टर बनण्याचे स्वप्न डोळ्यात घेऊन पुण्यात आलेल्या (Pune News) एका २१ वर्षीय तरुणीचा टोलेजंग इमारतीच्या नवव्या मजल्यावरून पडून अचानक मृत्यू झाला.

Pune News : पुण्यातील उच्चभ्रू आणि शैक्षणिक केंद्र मानल्या जाणाऱ्या कात्रज परिसरात एका घटनेने संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. डॉक्टर बनण्याचे स्वप्न डोळ्यात घेऊन पुण्यात आलेल्या (Pune News) एका २१ वर्षीय तरुणीचा टोलेजंग इमारतीच्या नवव्या मजल्यावरून पडून अचानक मृत्यू झाला. भरदुपारी घडलेल्या या थरारक प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून भारती विद्यापीठ परिसरात भीती आणि संशयाचे सावट पसरले आहे.
मृत तरुणीचे नाव माया रेड्डी असून ती मूळची हैदराबादची रहिवासी होती. वैद्यकीय शिक्षणासाठी पुण्यात स्थायिक झालेली माया येथील नामांकित भारती विद्यापीठात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिकत होती. शिक्षणासाठी तिने कात्रज परिसरातील (Pune News) एका उच्चभ्रू सोसायटीत आश्रय घेतला होता.
नेहमीप्रमाणे सुरू असलेल्या दैनंदिन वातावरणात आज दुपारी साधारण एक वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या आवारात अचानक मोठा आवाज झाला. सोसायटीतील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली असता माया रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडलेली दिसली. नवव्या मजल्यावरून खाली पडल्याने तिचा जागीच दुर्दैवी अंत झाला.
घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून परिसर ताब्यात घेतला. पोलिसांनी तातडीने पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
भरदुपारी १ वाजता नेमके असे काय घडले की या तरुण डॉक्टरने टोकाचे पाऊल उचलले? हा निव्वळ अपघात होता की आत्महत्येचा प्रयत्न? अभ्यासाचा असह्य ताण होता, वैयक्तिक नैराश्य, की यामागे आणखी काही भीषण गुपित दडले आहे? या सर्व अनुत्तरित प्रश्नांचा शोध आता पोलीस घेत आहेत.
एका हुशार आणि भावी डॉक्टरच्या अशा अनपेक्षित (Pune News) जाण्याने तिच्या महाविद्यालयातील मित्रमैत्रिणींमध्ये प्रचंड शोक व्यक्त केला जात असून पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.






