Nasrapur Case : ‘नराधमांना भर चौकात फाशी द्या!’, नसरापूर घटनेच्या निषेधार्थ मनविसेचे नवले ब्रीजवर तीव्र आंदोलन
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज नवले ब्रीज चौक येथे नसरापूर (Nasrapur Case) येथील संतापजनक घटनेच्या निषेधार्थ “भर चौकात फाशी” हे तीव्र आंदोलन करण्यात आले.

Nasrapur Case : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज नवले ब्रीज चौक येथे नसरापूर (Nasrapur Case) येथील संतापजनक घटनेच्या निषेधार्थ “भर चौकात फाशी” हे तीव्र आंदोलन करण्यात आले.
वाढत चाललेल्या महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांविरोधात (Nasrapur Case) तीव्र संताप व्यक्त करत विकृत नराधमाच्या पुतळ्याला भर चौकात प्रतीकात्मक फासावर लटकवून निषेध नोंदविण्यात आला.
बदलापूर, ठाणे, चाकण आणि आता नसरापूर अशा सलग घडणाऱ्या घटनांमुळे संपूर्ण समाजात संतापाची लाट निर्माण झाली असून अशा विकृत नराधमांना तात्काळ कठोरात कठोर शिक्षा (Nasrapur Case) झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका आंदोलनातून मांडण्यात आली. केवळ निषेध आणि आश्वासने नकोत, चौका चौकात फाशी दिली पाहिजे किंवा एन्काऊंटर केला पाहिजे अशी मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाला फ्री हँड देण्याची मागणी करत, अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या नराधमांना भर चौकात फासावर लटकविण्यासारखी कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला शक्ती कायदा अद्याप का पारित करण्यात आलेला नाही? या सरकारला नेमकी कोणती अडचण आहे? असा थेट जाब उपस्थित करत निष्क्रिय सरकारचा तीव्र शब्दांत धिक्कार करण्यात आला.
अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले असून राज्यभर अशा घटनांविरोधात अधिक तीव्र भूमिका घेतली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
शहर अध्यक्ष धनंजय दळवी आणि खडकवासला विभाग अध्यक्ष नीलेश जोरी यांनी आयोजित केलेल्या या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्र. राज्य संघटक प्रशांत कनोजिया, महा. राज्य सचिव आशिष साबळे, राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक भाई थिटे, रवी बनसोडे, शैलेश वीटकर, विभाग अध्यक्ष संतोष वरे, हेमंत बोळगे, आशुतोष माने, अशोक पवार, केतन डोंगरे आदी पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






