Sunetra Pawar : राष्ट्रवादीत चौथी विकेट पडणार? सुनेत्रा पवार दुसरा मोठा निर्णय घेणार?
Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे आणि रुपाली चाकणकर यांच्यानंतर आता नरहरी झिरवाळ यांची 'चौथी विकेट' पडण्याची शक्यता आहे.

Sunetra Pawar : मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला असून मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणानंतर त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली असून पक्षात ‘चौथी विकेट’ पडणार का, अशी चर्चा सुरू आहे.
याआधी धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे आणि रुपाली चाकणकर यांच्या प्रकरणांनंतर आता झिरवाळ यांच्यावरही कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. झिरवाळ यांनी स्वतः फोन करून व्हिडीओबाबत माहिती दिली असून, अनेक क्लिप्स एकत्र करून चुकीच्या पद्धतीने तो तयार केल्याचा दावा त्यांनी केला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस पुढे म्हणाले की, संबंधित व्हिडीओची सत्यता तपासली जाईल. झिरवाळ यांना याबाबत तक्रार दाखल करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. सर्व बाबींची शहानिशा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल.
तसेच, या प्रकरणात सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा करून पुढील कारवाई ठरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता राष्ट्रवादीतील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.





