नरेंद्र मोदी वाराणसीतून तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात; आतापर्यंत येथून भाजपने किती वेळा मिळवला विजय ?

Lok Sabha Election 2024 | देशातील लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून 2024 रोजी (शनिवार) पार पडणार आहे. या टप्प्यात वाराणसी लोकसभा मतदार संघातील मतदान होणार आहे. जिथून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्यासह 6 उमेदवार रिंगणात आहेत.
भाजपने ही जागा 7 वेळा जिंकली
2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते पंतप्रधान बनले. 1991 ते 2019 च्या निवडणुकीपर्यंत भाजपने ही जागा 7 वेळा जिंकली आहे. या काळात 2004 मध्येच काँग्रेसला येथून विजय मिळाला होता. त्यानंतर 2009 मध्ये भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या मुख्तार अन्सारी यांचा पराभव केला.
2009 मध्ये मोदी लोकसभेवर येण्यापूर्वी मुरली मनोहर जोशी यांनी ही जागा जिंकली होती. त्याच वेळी, या जागेवर बहुतेक मतदार हिंदू आहेत, ज्यात ब्राह्मण, भूमिहार आणि जैस्वाल यांचा समावेश आहे, त्यानंतर मुस्लिम आणि ओबीसी आहेत. वाराणसी लोकसभा मतदारसंघात रोहनिया, वाराणसी उत्तर, वाराणसी दक्षिण, वाराणसी कँट, सेवापुरी हे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत.
नरेंद्र मोदी विरुद्ध अजय राय लढत Lok Sabha Election 2024 |
वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भाजपचे उमेदवार असताना, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या युतीमध्ये ही जागा काँग्रेसकडे गेली आहे. त्यामुळे काँग्रेसने पुन्हा एकदा अजय राय यांना या जागेवरून उमेदवारी दिली आहे. तर, अजय राय वाराणसी लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत.
वाराणसीतून 8 जण निवडणुकीच्या रिंगणात
यावेळी भाजपकडून नरेंद्र मोदी, काँग्रेसकडून अजय राय, बहुजन समाज पक्षाकडून अथर जमाल लारी, अपना दल कडून गगन प्रकाश, राष्ट्रीय समाजवादी जनक्रांती पक्षाकडून पारस नाथ केशरी, युग तुलसी पक्षाकडून कोळी शेट्टी शिवकुमार आणि अपक्ष संजय कुमार तिवारी आणि दिनेशकुमार यादव मैदानात आहेत. याशिवाय नामनिर्देशनपत्रांच्या छाननीनंतर 41 पैकी 33 जणांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. हे सर्व अर्ज फेटाळल्यानंतर आता 8 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत
2019 लोकसभा निवडणूक
2019 मध्ये अजय राय यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे उमेदवार म्हणून वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. यावेळीही त्यांचा सामना पंतप्रधान मोदी आणि सपा-बसपाच्या संयुक्त उमेदवार शालिनी यादव यांच्याशी झाला. पीएम मोदींना 6,74,664 मते, सपाच्या शालिनी यादव यांना 1,95,159 आणि काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांना 1,52,548 मते मिळाली होती.
2014 लोकसभा निवडणूक
तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नरेंद्र मोदींनी ही जागा जिंकली, त्यांना 5,81,022 मते मिळाली होती. तर आपचे अरविंद केजरीवाल 2,09,238 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आणि काँग्रेसचे अजय राय 75,614 मतांसह तिसऱ्या स्थानावर होते. दरम्यान, तर यंदा वाराणसीमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे.
हेही वाचा:
‘फुंकर मारून पाणी आणणे मला शक्य नाही’ भाजप मंत्र्यांचे धक्कादायक विधान





