शिंदेगटाच्या शहर प्रमुखपदी नाना भानगिरे

पुणे : पुण्यातील शिंदे गटाची जबाबदारी अखेर शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि एकनाथ शिंदे समर्थक नाना भानगिरे यांच्यावर देण्यात आली आहे. शिंदे गटकडून शिवसेनेची जुनी कार्यकारीणी बरखास्त करून नवीन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे. त्यात, पुण्याची जबाबदरी भानगिरे यांच्याकडे देण्यात आली असून शहर तसेच जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून अजय भोसले यांची तर जिल्हाप्रमुख म्हणून रमेश कोंडे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारीनी बरखास्त करून नवीन कार्यकारीणी नियुक्त करण्यात आली आहे. शिंदेगटाने शिवसेनेत बंडाची भूमिका घेतल्यानंतर पुण्यातील शिवसैनिक तसेच आजी-माजी नगरसेवकांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला असला तरी गेली अनेक वर्षे शिवसेनेत असूनही काहीच लक्ष दिले जात असल्याने अनेक नाराज शिवसैनिक शिंदेगटात सामील होत होते. त्याची सुरूवात भानगिरे यांच्यापासून झाली होती.
भानगिरे 2004 पासून शिवसेनेत असून 2007 मध्ये ते शिवसेनेचे नगरसेवक म्हणून महापालिकेत निवडून आले. हडपसर विधानसभा मतदरासंघात त्यांनी शिवसेनेच्या विस्तारासाठी काम केले.त्यानंतर पक्षाकडून त्यांना 2006 संघटनेत हडसपर विभाग प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी त्यांनी पक्षवाढीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यानंतरही शिवसेने सोबत असलेले भानगिरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत पक्षातून बाहेर पडले. तर मुख्यमंत्र्यांनी त्यांनी आता पुण्याची जबाबदारी दिल्याने, भानगिरे आणि भोसले यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूका त्यांच्या नेतृत्वाखालीच लढविल्या जाणार असल्याचे चित्र आहे.
2003 पासून पक्षात मी एकनिष्ठपणे काम केले. तर 2007 नंतर नगरसेवक असूनही पक्षाकडून मला काहीही देण्यात आले नाही.मात्र, केवळ आणि केवळ मुख्यमंत्री शिंदे यांनी माझ्यावर विश्वास दाखविल्याने मी त्यांच्या सोबतच आहे. तर आता त्यांनी आपल्यावर पुण्याची जबाबदारी देत पुन्हा एकदा विश्वास दाखविला असून शहरातील अनेक पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक आमच्या संपर्कात असून लवकरच ते आमच्या सोबत असतील.
– नाना भागगिरे, शहर प्रमुख ( शिवसेना शिंदेगट)





