Nagar : नगरमध्ये मराठा वधू-वर परिचय मेळावा

अहिल्यानगर : सरपंच परिषद व मराठा सोयरीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.16 एप्रिल) शहरातील गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात 96 वा मराठा वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला आहे.
या वधू-वर परिचय मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच परिषद कोअर कमिटी प्रमुख आबासाहेब सोनवणे पाटील, मराठा सोयरीक संस्थेच्या संचालिका जयश्री अशोक कुटे व शब्दगंध साहित्यिक परिषदेचे राजेंद्र उदागे पाटील यांनी केले आहे. मराठा वधू वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन सरपंच परिषदचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या हस्ते होणार आहे.
प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच परिषद कोअर कमिटीचे राज्य उपाध्यक्ष जे. डी. टेमगिरे हे असणार आहेत सायंकाळी 5 वाजता या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.
या वधू वर परिचय मेळाव्यासाठी जगदंब फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश लंघे, मराठा सोयरीकचे अध्यक्ष अशोक कुटे, नानासाहेब दानवे, प्रमोद झावरे, संपतराव सोनवणे, मधुकर निकम, अन्नपूर्णा ढम, अनिल अकोलकर, गोरक्षनाथ पटारे, संदीप जगताप, अमोल धनवडे, मोहन हेलकुटे, योगेश कोतकर, पारुनाथ ढोकळे, राजेंद्र औताडे, राजेंद्र भापकर आदी प्रयत्नशील आहे.





