N.Chandrasekaran : टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन होणार पायउतार; फेब्रुवारी 2027 पर्यंत राहणार कार्यरत
टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांच्याशी पुनर्नियुक्तीवरून झालेल्या दीर्घकालीन मतभेदांनंतर एन. चंद्रशेखरन (N.Chandrasekaran) अर्थात एन. चंद्रा हे फेब्रुवारी २०२७ मध्ये आपला सध्याचा कार्यकाळ संपताच टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होणार आहेत.

N.Chandrasekaran : टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांच्याशी पुनर्नियुक्तीवरून झालेल्या दीर्घकालीन मतभेदांनंतर एन. चंद्रशेखरन (N.Chandrasekaran) अर्थात एन. चंद्रा हे फेब्रुवारी २०२७ मध्ये आपला सध्याचा कार्यकाळ संपताच टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होणार आहेत. या निर्णयामुळे भारतातील सर्वात प्रभावशाली व्यावसायिक समूहांपैकी एकाचे नेतृत्व करणाऱ्या त्यांच्या दशकाभराच्या कारकिर्दीची सांगता होणार आहे.
एन. चंद्रा (N.Chandrasekaran) यांनी टाटा सन्स बोर्डाला दिलेल्या माहितीनुसार, २० फेब्रुवारी २०२७ रोजी त्यांचा सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर ते पुढील कार्यकाळासाठी किंवा पुनर्निवडीसाठीआपल्या नावाचा विचार केला जाऊ नये. कारभाराचे हस्तांतरण सुरळीतपणे व्हावे यासाठी त्यांनी मंडळाला लवकरात लवकर उत्तराधिकारी निश्चित करण्यास सांगितले.
तसेच टाटा ग्रुपमध्ये आपली ४० वर्षांची व्यावसायिक कारकीर्द पूर्ण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच गेल्या दशकभरापासून टाटा सन्सचे नेतृत्व करणे हा आपल्यासाठी मोठा सन्मान आणि जबाबदारी होती, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केली.
हा निर्णय टाटा सन्समधील त्यांच्या पुढील वाटचालीबाबत अनेक महिन्यांपासून असलेल्या अनिश्चिततेनंतर घेण्यात आला आहे. हा प्रस्ताव २४ फेब्रुवारीच्या मंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला होता, परंतु एका संचालकाने त्याला पाठिंबा न दिल्याने तो मंजूर होऊ शकला नव्हता. सहा महिन्यांनंतरही कोणताही तोडगा न निघाल्याने नेतृत्वाबाबतची ही अनिश्चितता आता असह्य झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, १२ जानेवारी २०१७ रोजी एन. चंद्ना यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. दिवंगत रतन टाटा यांच्या विश्वासावर पुढे आलेले एन. चंद्रा हे टाटा ग्रुपच्या इतिहासातील पहिले असे अध्यक्ष आहेत, जे टाटा कुटुंबातील किंवा संस्थापक कुटुंबाचे वारसदार नाहीत. त्यांच्या काळात टाटा ग्रुपच्या अनेक शेअर्सचे मूल्य १० पटींपेक्षा जास्त वाढले आहेत.
तीन जणांनी नावे आघाडीवर
एन. चंद्रा यांच्यानंतर (N.Chandrasekaran) टाटा सन्सची सूत्रे कोण हाती घेईल किंवा टाटा सन्सने अधिकृतपणे उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केलेली नाही. मात्र, नोएल टाटा, सौरभ अग्रवाल आणि टी. व्ही. नरेंद्रन यांची नावे प्रामुख्याने समोर येत आहेत. टाटा स्टील कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे माजी प्रमुख प्रभात शर्मा हे सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहेत. टी. व्ही. नरेंद्रन हे देखील या शर्यतीत आहेत.






