Rani Kapoor : “माझ्या मुलाची हत्या झाली…”; संजय कपूर यांच्या आईचा खळबळजनक दावा, पोलिसांना लिहिलेल्या पत्रात कोणती मागणी केली?
Rani Kapoor : उद्योपती संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर मोठी खळबळ उडाली होती. बॅडमेंटन खेळल्यानंतर काही वेळाने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर आली होती. या प्रकरणाची मोठी चर्चा देशभरात केली जात होती. त्यांचा मृत्यू घशात मधमाशीने दंश केला त्यांनंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले होते. आता संजय कपूर यांची आई राणी कपूर यांनी धक्कादायक दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात संजयची आई आणि सोना कॅामस्टरच्या माजी अध्यक्षा राणी कपूर यांनी मुलाचा मृत्यू अपघात नसून हत्या असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी गुन्हेगारी तपासाबाबत ब्रिटिश पोलिसांना एक विशेष पत्र लिहिले असून, या पत्रात अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. उद्योपती संजय कपूर हे बॅालिवूडमधील अभिनेत्री करिश्मा कपूर हिचे एक्स पती होते.
मिड डे नुसार, संजयची आई राणी कपूर यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूभोवती असलेल्या अस्पष्ट रहस्यमय परिस्थितीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच संजय यांचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नव्हता, तर तो एका वाईट कटाचा भाग होता, असा दावा राणी कपूर यांनी केला आहे.
ब्रिटिश कायदा अंमलबजावणी संस्थांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केल्याचेही वृत्त आहे. मूळात या संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ३० कोटी रुपयांच्या वारसा हक्काचा वाद सुरू असून, या प्रकरणात अनेक धक्कादाक दावे करण्यात येत आहेत. संजयची दुसरी पत्नी प्रिया सचदेव यांची सोना कॅामस्टरच्या नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मालमत्तेवर करिश्मा कपूर देखील दावा करू शकतात, अशी देखील बातमी आहे.
‘त्या’ पोस्टनंतर निधनाची बातमी





