अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी शोक व्यक्त करणारी पोस्ट लिहिली अन्…; करिश्मा कपूरच्या एक्स पतीचे निधन

Businessman Sanjay Kapoor : १२ जून हा दिवस देशवासीयांसाठी मन्न सुन्न करणारा ठरला. अहमदाबाद येथे विमान दुर्घटेची दुर्देवी घटना घडली असून, विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये २३० प्रवासी आणि १२ क्रू सदस्यांचा समावेश होता. दैवबलवत्तर म्हणून एक प्रवासी या दुर्घटनेतून बचावला आहे.
या विमान दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांची नावे आता समोर येत आहेत. अशातच अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा एक्स पती आणि उद्योपती संजय कपूर यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने इंग्लंडमध्ये निधन झाले आहे. विशेष म्हणजे अहमदाबाद येथील घटनेवर त्यांनी एक्सवरून शोक व्यक्त केल्यानंतर त्यांचे निधन झाले असल्याची माहिती मिळत आहे.
पोलो खेळत असताना ते अचानक खाली पडले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. अभिनेता आणि लेखक सुहेल सेठ यांनी एक्सवरून संजय कपूर यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. संजय कपूर यांनी मृत्यू होण्याअगोदर काही तासापूर्वी अहमदाबाद दुर्घटनेविषयी ट्वीट केले होते.
‘अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमान अपघाताची खूप दुःखद बातमी मिळाली. माझ्या संवेदना आणि प्रार्थना सर्व पीडित कुटुंबांसोबत आहेत. देव त्यांना या कठीण काळात शक्ती आणि धैर्य देवो.’ असे ट्वीट त्यांनी १२ जून रोजी संध्याकाळी पाच वाजता केले होते.
…अन् घटस्फोट घेतला.
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे २००३ साली लग्न झाले होते. ११ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि २०१४ ला त्यांचा घटस्फोट झाला. करिश्मा आणि संजय यांना मुलगी समायरा आणि मुलगा कियान ही दोन अपत्ये आहेत. मुलांची कस्टडी करिश्माला मिळाली. संजय कपूर यांचा करिश्मा कपूरशी घटस्फोट झाल्यानंतर प्रिया सचदेव यांच्याशी लग्न झाले होते.
हेही वाचा: Ramesh Vishwashkuma : विमान दुर्घटनेतून वाचलेल्या एकमेव प्रवाशाने सांगितला धक्कादायक प्रसंग?





