Ganesh Visarjan Pune 2025 : मुरली अण्णांनी काढला तोडगा; अखेर पुणे गणपती विसर्जन मिरवणुकीचा वाद मिटला, काय ठरलं?

Ganesh Visarjan Pune 2025 : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर हा वाद मिटवण्यात पुण्याचे खासदार आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना यश आलं आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक लवकर काढावी, अशी मागणी इतर गणेश मंडळांकडून करण्यात आली होती.
यामुळे गणपती मिरवणुकींच्या अगोदर मिरवणूक काढण्याचा निर्णय गणेश मंडळांनी घेतला आहे. अशातच काल 21 ऑगस्ट या दिवशी पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी महत्त्वाची बैठक घेतली. मात्र, या बैठकीतही यावर तोडगा निघाला नाही. अखेर आज केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ बैठक घेतली. या बैठकीत अखेर गणेशोत्सवाचा वाद मिटला आहे.
त्यानुसार परंपरेनुसार विसर्जन मिरवणुक होणार आहे. सकाळी 9.30 वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीला मानाचे गणपती मंडळाचे प्रतिनिधी आणि इतर गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होते. या बैठकीला मोहोळ यांच्यासह कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासने याच्यांसह काही पदाधिकीर उपस्थित होते.
नेमका वाद काय?
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीवरून चांगलाच वाद रंगला होता. या वादाला घेऊन अनेक गोष्टी दरम्यानच्या काळात घडल्या. काही मंडळांनी बैठका घेऊन मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं होतं. यामुळे पुण्यातील गणेश उत्सवात नाराजीचा सूर उमटला होता.
अखेर तोडगा निघाला
या वादावर तोडगा काढण्यासाठी आतापर्यंत पोलिसांनी अनेक बैठक घेतल्या. मात्र, यावर तोडगा निघाला नाही. हा वाद थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेला. त्यानंतर हा वाद मिटविण्यासाठी खासदार मुरलीधर मोहोळ आणि आमदार रासने यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता या वादावर तोडगा निघाला आहे, त्यामुळे गणेशउत्सवातील मंडाळांमधील पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हेही वाचा : Pune News : पोलीस मित्र संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा





