Mumbai : टीम इंडियातील 4 मुंबईकर खेळाडूंचा विधान भवनात होणार सत्कार – आमदार सरनाईक

मुंबई :- टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया मायदेशात परतली आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर टीम इंडिया मुंबईत दाखल झाली. मुंबईत टीम इंडियाची भव्य व्हिक्ट्री परेड निघाली. त्यामुळे आपल्या जगज्जेत्या खेळांडूचा भव्य सत्कार करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले होते. उद्या टीम इंडियाच्या खेळाडूंचा विधानभवनातही सत्कार होणार आहे. यावेळी मुंबईकर खेळाडूंचा विशेष सन्मान केला जाणार आहे.
शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे. टीम इंडीयातील ४ खेळाडू मुंबईकर आहेत. हे चारही जण महाराष्ट्रातील आहेत. रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा उद्या सत्कार करण्यात येणार आहे.
T20 World Cup 2024 : टीम इंडिया मायदेशात परतल्यानंतर काय-काय झालं? पहा, सर्व फोटो एका क्लिकवर…
विधीमंडळ आवारात टीम इंडियातील खेळाडू येणार आहेत. त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. टीम इंडियाने विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळे चार खेळाडू उद्या विधान भवनात येतील. त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या खेळाडूंनी देशाची मान उंचावली आहे. त्यामुळे या खेळाडूंचा आम्ही योग्य तो सन्मान करणार आहोत, असेही प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.





