Rajya Sabha Election 2026: महाराष्ट्रातून रिक्त होणाऱ्या सात राज्यसभा जागांसाठी अर्ज दाखल करण्याची आजची अंतिम मुदत संपताच एक महत्त्वाची बाब स्पष्ट झाली — सात जागांसाठी नेमके सात अर्जच दाखल झाल्याने सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट करत सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले आणि बिनविरोध निवडीसाठी सहकार्य केलेल्या सर्व पक्षांचेही आभार मानले. सात निवडून आलेले उमेदवार – (Rajya Sabha Election 2026) महायुतीकडून -रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण इवनाते, रामराव वडकुते (भाजप), ज्योती वाघमारे (शिवसेना — शिंदे गट) आणि पार्थ पवार (राष्ट्रवादी काँग्रेस — अजित पवार गट). महाविकास आघाडीकडून — शरद पवार. हेही वाचा – रामदास आठवले, विनोद तावडे, शरद पवार यांनी राज्यसभेसाठी दाखल केले अर्ज; महाराष्ट्रातून 7 उमेदवार रिंगणात मतदान होणार, पण निकाल निश्चित – (Rajya Sabha Election 2026) औपचारिकदृष्ट्या मतदान १६ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता होईल. मात्र उमेदवारांची संख्या जागांइतकीच असल्याने निकाल आधीच निश्चित झाला आहे. राज्यसभा निवडणूक एकल हस्तांतरणीय मत पद्धतीने (Single Transferable Vote) होते. महाराष्ट्र विधानसभेचे २८८ आमदार मतदार असतात. एक उमेदवार निवडून येण्यासाठी साधारण ३७ मते आवश्यक असतात. महायुतीकडे सध्या सुमारे २३० आमदारांचे संख्याबळ असल्याने सहा जागा सहज जिंकण्याची क्षमता आहे. महाविकास आघाडीकडे सुमारे ५० आमदार असल्याने शरद पवारांची एक जागा निश्चित होती. रोहित पवार काय म्हणाले? (Rajya Sabha Election 2026) आमदार रोहित पवार यांनी लिहिले की, हे सर्वजण महाराष्ट्राचा आवाज म्हणून राज्यसभेत उत्तम कामगिरी बजावतील असा विश्वास आहे. कोणत्याही चुकीच्या प्रथेला संधी न देता बिनविरोध निवड घडवून आणल्याबद्दल त्यांनी सर्व पक्षांचे विशेष आभार मानले.