Kaustubh Sangle : कौस्तुभ सांगळे मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; महिलेसोबतचे ‘ते’ फोटो…
Kaustubh Sangle : राज्य राखीव पोलीस दल (SRPF) गट-16 मधील कॉन्स्टेबल कौस्तुभ सांगळे यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात अनेक नवीन पैलू समोर येत आहेत.

Kaustubh Sangle : मुंबईतील मलबार हिल परिसरातील ‘महाराष्ट्र लोक भवन’ येथे कर्तव्यावर असताना राज्य राखीव पोलीस दल (SRPF) गट-16 मधील कॉन्स्टेबल कौस्तुभ सांगळे यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात अनेक नवीन पैलू समोर येत आहेत. या प्रकरणात वैयक्तिक संबंध, मानसिक तणाव आणि कौटुंबिक परिस्थिती अशा विविध अंगांनी तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Kaustubh Sangle)
माहितीनुसार, कौस्तुभ सांगळे हे 2024 च्या तुकडीतील SRPF कॉन्स्टेबल होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची मुंबईतील अतिसंवेदनशील ‘महाराष्ट्र लोक भवन’ येथे नियुक्ती करण्यात आली होती. सोमवारी सायंकाळी कर्तव्यावर असताना त्यांनी त्यांच्या सर्व्हिस SLR रायफलने गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपास यंत्रणांनी नोंदवला असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. (Kaustubh Sangle)
प्रेमसंबंधांचाही तपास
तपासाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, कौस्तुभ यांचे मीरा-भाईंदर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये विवाहाबाबत चर्चा झाली होती. मात्र नंतर संबंधित महिलेने विवाहास नकार दिला आणि तिचे लग्न दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. (Kaustubh Sangle)
याच पार्श्वभूमीवर, कौस्तुभ यांनी संबंधित महिलेसोबतचे काही खाजगी फोटो तिच्या होणाऱ्या पतीला पाठविल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या घटनेमुळे कोणताही वाद निर्माण झाला होता का, याचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. (Kaustubh Sangle)
आत्महत्येच्या धमक्यांचाही तपास
सूत्रांच्या माहितीनुसार, कौस्तुभ यांनी संबंधित महिला कॉन्स्टेबलला वारंवार आत्महत्येच्या धमक्या दिल्याचेही तपासात समोर आले आहे. तसेच, या संदर्भात संबंधित महिलेने पूर्वीच स्थानिक पोलिसांना माहिती दिली होती का, याचीही पडताळणी केली जात आहे. (Kaustubh Sangle)
![]()
मानसिक आरोग्य आणि कौटुंबिक पार्श्वभूमीची चौकशी
तपासादरम्यान कौस्तुभ यांच्या कौटुंबिक परिस्थितीचाही अभ्यास केला जात आहे. तसेच, SRPF कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेली नियमित मानसिक आरोग्य तपासणी त्यांची झाली होती का, याचीही चौकशी सुरू आहे. (Kaustubh Sangle)
दरम्यान, मलबार हिल पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची (ADR) नोंद केली असून, आत्महत्येचे नेमके कारण आणि सर्व संबंधित बाबींचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून अद्याप कोणत्याही एका कारणाला अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. (Kaustubh Sangle)





