Mumbai Indians Playoffs : मुंबई इंडियन्सची प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी ‘अग्निपरीक्षा’! नेमकं काय आहे समीकरण? जाणून घ्या
Mumbai Indians Playoffs : ५ पराभव होऊनही मुंबईचा संघ अजूनही बाद झालेला नाही, पण त्यांचा पुढील प्रवास आता स्वतःच्या कामगिरीवर नाही तर दुसऱ्यांवर अवलंबून आहे.

Mumbai Indians Playoffs Scenario in WPL 2026 : गतविजेत्या मुंबई इंडियन्ससाठी डब्ल्यूपीएल २०२६ चा हंगाम आतापर्यंत काही खास राहिला नाही. मुंबई इंडियन्सला १९ व्या सामन्यात गुजरात जायंट्सकडून ११ धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर मुंबईचा संघ गुणतालिकेत पेचात अडकला आहे. कारण त्यांचे सर्व ८ साखळी सामने आता संपले आहेत. मात्र, ५ पराभव होऊनही मुंबईचा संघ अजूनही बाद झालेला नाही, पण त्यांचा पुढील प्रवास आता स्वतःच्या कामगिरीवर नाही तर दुसऱ्यांवर अवलंबून आहे.
मुंबईसाठी काय आहे ‘प्लेऑफ’चं गणित? –
हमरनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सने ८ सामन्यांपैकी केवळ ३ सामने जिंकले असून त्यांच्या खात्यात ६ गुण आहेत. सध्या दिल्ली कॅपिटल्सकडेही ६ गुण आहेत, तर युपी वॉरियर्स ४ गुणांसह तळाला आहे. मुंबईला एलिमिनेटरमध्ये पोहोचण्यासाठी खालील समीकरण जुळून येणे आवश्यक आहे:
दिल्ली विरुद्ध युपी सामना: १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात युपी वॉरियर्सने दिल्ली कॅपिटल्सला हरवावे, अशी प्रार्थना मुंबईचे चाहते करत असतील.
गुणांची बरोबरी: जर युपीने दिल्लीला हरवले, तर मुंबई, दिल्ली आणि युपी या तिन्ही संघांचे प्रत्येकी ६ गुण होतील.
🔙 to 🔙 appearances in the playoffs 🧡
🎥 The sweet taste of a crucial win and a Top 3⃣ spot, ft. @Giant_Cricket Head Coach Michael Klinger 🙌 – By @ameyatilak #TATAWPL | #KhelEmotionKa | #GGvMI pic.twitter.com/LL8VEu57vK
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 31, 2026
नेट रनरेट ठरणार ‘गेम चेंजर’ –
जर तिन्ही संघांचे गुण ६-६ झाले, तर निर्णय नेट रनरेटच्या (NRR) आधारावर घेतला जाईल. येथे मुंबई इंडियन्सची स्थिती इतर दोन संघांच्या तुलनेत खूपच मजबूत आहे:
डब्ल्यूपीएल २०२६ मधील मुंबई इंडियन्स प्लेऑफ समीकरण
मुंबई इंडियन्स: +०.०५९ (सर्वोत्तम)
दिल्ली कॅपिटल्स: -०.१६४
युपी वॉरियर्स: -१.१४६
त्यामुळे जर युपीने दिल्लीला पराभूत केले, तर सरस नेट रनरेटच्या जोरावर मुंबई इंडियन्स थेट एलिमिनेटरचे तिकीट मिळवू शकते.
आरसीबी आणि गुजरातचे स्थान निश्चित –
स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने ८ पैकी ६ सामने जिंकून थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे, गुजरात जायंट्सने देखील प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले असून ते एलिमिनेटरमध्ये खेळणार आहेत. आता एलिमिनेटरमध्ये गुजरातचा सामना कोणाशी होणार (मुंबई की दिल्ली), याचे उत्तर १ फेब्रुवारीच्या सामन्यातून मिळणार आहे.





