IND vs AFG 1st ODI : भारत-अफगाणिस्तानच्या पहिल्याच वनडेवर पावसाचे सावट, हवामान खात्याकडून ‘येलो अलर्ट’, सामना होणार की नाही?
IND vs AFG 1st ODI : वनडे मालिकेतील पहिला सामना धरमशालाच्या अत्यंत देखण्या आणि सुंदर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच क्रिकेट चाहत्यांसाठी एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे.

IND vs AFG 1st ODI Dharamshala Rain Forecast Weather Yellow Alert : भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्धचा कसोटी सामना एक डाव आणि ३०० धावांनी जिंकून ऐतिहासिक पराक्रम केल्यानंतर, आता दोन्ही संघांमधील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला १३ जूनपासून सुरुवात होत आहे. या मालिकेच्या निमित्ताने टीम इंडियाच्या वर्ष २०२७ मधील वनडे विश्वचषकाच्या तयारीचा श्रीगणेशा होणार आहे. मालिकेतील पहिला सामना धरमशालाच्या अत्यंत देखण्या आणि सुंदर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच क्रिकेट चाहत्यांसाठी एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे.
९० टक्के पावसाची शक्यता; ओव्हर्स कमी होणार?
हवामान विभागाने सामन्याच्या दिवशी येथे ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला असून, पावसाळ्यामुळे सामना थेट रद्द होण्याची भीती वर्तवली जात आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या (IMD) अहवालानुसार, धरमशालामध्ये १३ ते १६ जून दरम्यान यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर आदल्या दिवशी म्हणजे १२ जूनला येथे ऑरेंज अलर्ट होता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होणार असून, दुपारी १:०० वाजता नाणेफेक (Toss) होईल.
🚨 Bad news for IND vs AFG fans! 🌧️⛈️
Rain is expected in Dharamshala, and the 1st ODI could face interruptions. Let’s hope the weather clears and we get a full match! 🤞🏏💙#INDvsAFG #Shubmangill #KLRahul pic.twitter.com/T495V80xly— BCCI XTRA (@BcciXtra3481) June 12, 2026
‘अॅक्यूवेदर’च्या (AccuWeather) रिपोर्टनुसार, १३ जून रोजी दिवसाच्या वेळी तब्बल ९० टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर संध्याकाळी हा आकडा ६५ टक्क्यांवर पोहोचेल. अशा परिस्थितीत सामन्यात पावसाचा मोठा व्यत्यय येणे निश्चित मानले जात असून, षटकांची (Overs) कपात केली जाऊ शकते किंवा सामना पूर्णपणे वाहून जाण्याची दाट शक्यता आहे. येथील तापमान १२ ते १८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
द्विपक्षीय मालिकेचा पहिलाच थरार अन् भारताचा दबदबा –
Breathtaking views and intense prep 🗻
📸 Snapshots from #TeamIndia‘s scenic training session in Dharamshala ahead of the 1️⃣st #INDvAFG ODI 🔛@IDFCFIRSTBank pic.twitter.com/sHg4K3Y05L
— BCCI (@BCCI) June 12, 2026
अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा रेकॉर्ड नेहमीच एकतर्फी आणि मजबूत राहिला आहे. आजवर या दोन्ही संघांमध्ये एकूण ४ वनडे सामने खेळले गेले आहेत, ज्यातील ३ सामन्यांत टीम इंडियाने बाजी मारली आहे, तर एक सामना ‘टाय’ (Tie) झाला होता.
विशेष म्हणजे, यापूर्वी भारत आणि अफगाणिस्तान केवळ मल्टी-नेशन स्पर्धांमध्येच (आशिया कप किंवा वर्ल्ड कप) आमनेसामने आले होते. क्रिकेटच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा दोन्ही देशांमध्ये स्वतंत्र द्विपक्षीय (Bilateral) वनडे मालिका खेळली जात आहे.





