Angkrish Raghuvanshi Fine : अंपायरवर राग काढला अन् खिसा रिकामा झाला! अंगकृष रघुवंशीला बीसीसीआयची मोठी शिक्षा
Angkrish Raghuvanshi Fine : केकेआरचा युवा फलंदाज अंगकृष रघुवंशी याला 'ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड' अंतर्गत बाद दिल्यानंतर मैदानावर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

Angkrish Raghuvanshi Fine IPL 2026 : आयपीएल २०२६ मधील ३८ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यातील लढत केवळ खेळासाठी नाही, तर एका मोठ्या वादासाठी लक्षात ठेवली जाईल. केकेआरचा युवा फलंदाज अंगकृष रघुवंशी याला ‘ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’ अंतर्गत बाद दिल्यानंतर मैदानावर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. यानंतर बीसीसीआयने अंगकृष रघुवंशीवर कारवाई केली आहे.
लखनौच्या इकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अंगकृष रघुवंशीची विकेट चर्चेचा विषय ठरली आहे. अंपायरने त्याला ‘फील्डिंगमध्ये अडथळा’ आणल्याप्रकरणी बाद घोषित केले, ज्यावर रघुवंशीने तीव्र संताप व्यक्त करताना बॅट जमिनीवर जोरात आदळली. त्यानंतर हेल्मेट जोरात फेकून दिले. मात्र, हे वर्तन त्याला महागात पडले असून बीसीसीआयने (BCCI) त्याच्यावर कडक कारवाई केली आहे.
The Finn Allen and Angkrish Raghuvanshi decisions show a clear lack of accountability. We need an anti-corruption committee for umpires to protect the game.#CheatingAgainstKKR pic.twitter.com/hdENsFMh0i
— Zahid Akhtar (@ZahidAk35965291) April 27, 2026
मैदानातील संताप अन् कारवाईचा बडगा –
आयपीएल आचारसंहितेच्या ‘लेव्हल १’ चा भंग केल्याप्रकरणी अंगकृष रघुवंशीच्या मॅच फीमधील २० टक्के रक्कम कापण्यात आली आहे. तसेच त्याच्या नावावर एक ‘डिमेरिट पॉईंट’ देखील नोंदवण्यात आला आहे.
⚠️ DISCIPLINARY ACTION IN IPL
– Angkrish Raghuvanshi fined 20% of match fees 💸
– Also handed 1 demerit point 📉#IPL2026 #Cricket pic.twitter.com/SqHMdJThVs— Akaran.A (@Akaran_1) April 27, 2026
कसा झाला हा संपूर्ण वाद?
केकेआरच्या डावातील पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अंगकृष रघुवंशीने मिड-ऑनला शॉट खेळला आणि धाव घेण्यासाठी धावला. मात्र, कॅमेरून ग्रीनने नकार दिल्याने तो पुन्हा आपल्या क्रीझकडे परतला. स्वतःला वाचवण्यासाठी त्याने डाइव्ह लावली, पण त्याच वेळी फिल्डरचा थ्रो त्याच्या पायाला लागला. लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने जोरदार अपील केले आणि तिसऱ्या अंपायरने रिप्ले पाहून रघुवंशीला बाद दिले. अंपायरच्या मते, रघुवंशीने जाणीवपूर्वक आपली दिशा बदलून थ्रोमध्ये अडथळा निर्माण केला होता. या एका निर्णयाने मॅचमधील वातावरण पूर्णपणे तापले.





