Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; उभ्या ट्रकला कारची धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Accident News : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (१५ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला आहे.

Accident News : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात घडला आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या अवजड वाहनाला भरधाव क्रेटा कारने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की कारचा चुराडा झाला. (Accident News)
प्राथमिक माहितीनुसार, महामार्गावर उभ्या असलेल्या अवजड वाहनाला मागून भरधाव वेगाने आलेल्या क्रेटा कारने जोरदार धडक दिली. धडकेनंतर कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. (Accident News)
त्यानंतर पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.अपघातात दोन महिला आणि दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. (Accident News)





