Mumbai News : मुंबईत १० बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल; गुन्हे शाखेची ६ उपनगरांत क्लिनिकवर धाड
Mumbai News : मुंबईत कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा मान्यताप्राप्त नोंदणी नसतानाही रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या १० बोगस डॉक्टरांचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

Mumbai News : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विविध भागांत बोगस डॉक्टरांकडून चालवल्या जाणाऱ्या अनेक क्लिनिकवर धाडी टाकल्या आणि २.२० लाख रुपये किमतीचे सिरिंज, अँटीबायोटिक गोळ्या व इतर साहित्य जप्त केले आहे. (Mumbai News)
महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक कायद्याच्या कलम ३३ आणि ३६ अन्वये भांडुप पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ७ ने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने उपनगरातील भांडुप, मानखुर्द, कुर्ला, जोगेश्वरी, बोरीवली आणि दहिसर येथील क्लिनिकवर या धाडी टाकल्या. (Mumbai News)
या संयुक्त कारवाईदरम्यान, दहा व्यक्ती कोणतीही वैद्यकीय पात्रता किंवा महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी नसतानाही, गुप्तरोगांसह विविध आजारांवर ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक आणि युनानी उपचार करताना आढळून आल्या. (Mumbai News)
काही प्रकरणांमध्ये वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली रुग्णांकडून अवाजवी शुल्क आकारले जात असे आणि त्यांना मुदत संपलेली औषधे विकली जात होती. पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. (Mumbai News)
Mumbai News : चार वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेला मृतदेह; मुंबईतील घटनेने खळबळ





