Mumbai Bangalore Highway : वारजे परिसरातील बाह्यवळणावर भीषण अपघात, भरधाव ट्रकची 9-10 वाहनांना जोरदार धडक…

पुणे :- मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वारजे परिसरातील बाह्यवळणावर भरधाव ट्रकने तब्बल नऊ ते दहा वाहनांना पाठीमागून धडक दिली. यामध्ये जिवीतहानी झाली नसली तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना रात्री आठच्या सुमारास घडली. त्यानंतर सुमारे दीड ते दोन तास महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
येथील प्रत्यक्षदर्शी कारचालक प्रणित चकवे यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत बेंझ कंपनीचा मोठा ट्रक (एम एच 10 डीटी 6026) चांदणी चौक कडून वारजेच्या दिशेने निघाला होता. येथील मॅकडोनाल्ड हॉटेलच्या समोर रस्त्यावर कोंडी झाल्यामुळे वाहने हळूहळू सरकत होती. त्याचवेळी आरएमडी कॉलेजच्या उड्डाण पुलावरून भरधाव येत असलेल्या ट्रकने रस्त्याच्या डाव्या लेन मधील एका लाल रंगाच्या स्विफ्ट मोटारीला धडक दिली.
Mumbai Bangalore Highway : वारजे परिसरातील बाह्यवळणावर भीषण अपघात, भरधाव ट्रकची 9-10 वाहनांना जोरदार धडक…
बातमीची लिंक 👇👇👇👇https://t.co/I0X4WiDF8w pic.twitter.com/7DE72bTuZL— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) September 2, 2024
धडक इतकी जोरात होती की, ती गाडी रस्त्याच्या कडेला दुभाजकावर गेली. अपघात झाल्यावर तो ट्रक उजवीकडे वळला. त्याने एका मागून एक अनेक मोटारींना धडक दिली. यामध्ये जिवीतहानी झाली नसली तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे.





