Mulshi Accident : मुळशीत पहाटे थरार! दारवली फाट्यावर भरधाव कार संरक्षक कठड्याला धडकली; एकाचा जागीच मृत्यू
Mulshi Accident : मुळशीतील दारवली फाटा पुन्हा एकदा रक्ताळला; पहाटेच्या काळोखात भरधाव कारचा भीषण अपघात.
Updated On:

Mulshi Accident – मुळशी तालुक्यातील दारवली (धनवेवाडी) फाटा येथे पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पौड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विजय राजेंद्र भोईर (वय 45, रा. नारायण पेठ, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. 27 एप्रिल रोजी पहाटे सुमारे 3.30 वाजण्याच्या सुमारास दारवली
(ता. मुळशी) येथील बसस्टॉपजवळ आरोपी जिग्नेश भरत सापरिया (रा. कर्वेनगर, पुणे) याने त्याच्या ताब्यातील मारुती वेगनार (एमएच 12 एक्सटी 5069) ही कार भरधाव वेगात, निष्काळजीपणे व वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून चालवित असताना रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या लोखंडी संरक्षक कठड्याला जोरदार धडक दिली.
या अपघातात कारमधील प्रवासी अनिकेत लक्ष्मण पोंगडे (वय 35, रा. धनकवडी, पुणे) यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. तसेच सिद्धेश शांताराम पवार (रा. पौड फाटा, कोथरूड, पुणे) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष दावलकर करीत आहेत.





