Jailer 2 Teaser : ‘मुझे मारकर चैन से नहीं जी पाएगा’; टायगर मुथुवेल पांडियन पुन्हा मैदानात! दमदार टीझर आऊट
Jailer 2 Teaser : टीझरची सुरुवात पहिल्या भागातील खलनायक वर्मन (विनायकन) याच्या दमदार संवादाने होते.

Jailer 2 Teaser : अखेर सुपरस्टार रजनीकांत यांच्या बहुप्रतीक्षित ‘जेलर २’ ( Jailer 2) चित्रपटाची चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित हा चित्रपट १५ ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
रिलीज झालेल्या टीझरने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. विशेष म्हणजे, टीझरमध्ये रजनीकांत यांचा चेहरा स्पष्टपणे दाखवलेला नसला तरी शेवटच्या क्षणी त्यांची दमदार झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते. यामुळे सोशल मीडियावर ‘जेलर २’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Jailer 2 Teaser)
टीझरची सुरुवात पहिल्या भागातील खलनायक वर्मन (विनायकन) याच्या दमदार संवादाने होते. तो आपल्या मोठ्या गुन्हेगारी जाळ्याचा इशारा देत सूडाची धमकी देताना दिसतो. त्यानंतर चित्रपटातील महत्त्वाच्या पात्रांची झलक दाखवली जाते आणि शेवटी दूर उभ्या असलेल्या रजनीकांत यांच्या एंट्रीने टीझरची सांगता होते. (Jailer 2 Teaser)
‘जेलर’च्या पहिल्या भागात एका निवृत्त जेलरची कथा दाखवण्यात आली होती. आपल्या पोलीस अधिकारी मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तो वर्मनविरुद्ध उभा ठाकतो आणि अखेर त्याचा खात्मा करतो. दुसऱ्या भागाची कथा याच घटनेनंतर पुढे सरकणार असल्याचे टीझरमधून दिसत आहे. (Jailer 2 Teaser)
‘जेलर २’मध्ये रजनीकांत यांच्यासोबत रम्या कृष्णन, योगी बाबू, मोहनलाल आणि विजय सेतुपती यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांच्या पाहुण्या भूमिकेचीही चर्चा रंगली आहे. बॅालिवूडमधील हृतिक रोशन आणि शाहरुख खान यांच्या विशेष उपस्थितीबाबतही चर्चा सुरू असून, जतीन सरना खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे वृत्त आहे. (Jailer 2 Teaser)
दसऱ्याच्या सुट्ट्यांचा फायदा लक्षात घेऊन ‘जेलर २’ची रिलीज डेट निश्चित करण्यात आली आहे. यामुळे चित्रपटाला मोठी ओपनिंग मिळेल, असे सांगितले जात आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होणार याविषयी चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. जेलरच्या पहिल्या भागाने बॅाक्स अॅाफिस दणाणून सोडले होते. चांगल्या ओपनिंगसह रिलीज झालेल्या या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती. त्यामुळे आता चाहत्यांना जेलर २ कडून देखील मोठ्या अपेक्षा आहेत. (Jailer 2 Teaser)




