Kalyani Priyadarshan : कोण साकारणार मधुबाला? साऊथमधून ‘या’ अभिनेत्रीचे नाव आघाडीवर
Kalyani Priyadarshan : मधुबाला यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये साऊथ सिनेमा इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीला कास्ट करण्याचा विचार बायोपिककर्त्यांचा असल्याची माहिती समोर आली आहे.

Kalyani Priyadarshan : हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक मानल्या जाणाऱ्या मधुबाला यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते फिल्मी कारकिर्दीपर्यंतचा प्रवास मोठ्या पडद्यावर बायोपिकद्वारे मांडला जाणार आहे.
या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका कोण साकारणार? यावरून अनेक अभिनेत्रींची नावे समोर येत होती. मात्र आता या भूमिकेसाठी एका दाक्षिणात्य अभिनेत्रीचे नाव आघाडीवर असून तिला ही भूमिका मिळू शकते अशी शक्यता आहे.
याअगोदर या भूमिकेसाठी कियारा अडवाणी, अनित पड्डा आणि धुरंधर फेम सारा अर्जुन या अभिनेत्रींच्या नावाची चर्चा होती. ताज्या माहितीनुसार, या महत्त्वाच्या भूमिकेसाठी दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शन हिला ऑफर देण्यात आल्याचे समोर येत आहे.

Kalyani Priyadarshan : कोण साकारणार मधुबाला? साऊथमधून ‘या’ अभिनेत्रीचे नाव आघाडीवर
‘लोका चॅप्टर 1’मधील तिच्या अभिनयामुळे निर्माते तिच्याकडे विशेष लक्ष देत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, मधुबालासारख्या दिग्गज अभिनेत्रीला भव्य श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने बायोपिक तयार केला जात आहे. Kalyani Priyadarshan
अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शन या भूमिकेसाठी योग्य निवड ठरू शकते, असे निर्माते आणि दिग्दर्शकांना वाटत आहे. या बायोपिकची निर्मिती संजय लीला भन्साळी करणार आहेत. तर दिग्दर्शन जसमीत के. रीन करणार आहेत.
याआधी त्यांनी डार्लिंग्स या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. या सिनेमात आलिया भट, शेफाली शाह आणि विजय वर्मा यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
दरम्यान, या बायोपिकमधील मुख्य भूमिकेबाबत अधिकृत नावाची घोषणा अद्याप झालेली नसली तरी कल्याणी प्रियदर्शनचे नाव आघाडीवर असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
कोण आहे कल्याणी प्रियदर्शन ? Kalyani Priyadarshan
कल्याणी ही ज्येष्ठ चित्रपट निर्माते प्रियदर्शन यांची मुलगी आहे. तिने 2017 मध्ये अखिल अक्किनेनीसोबत ‘हॅलो’ या सिनेमातून अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर ती ‘चित्रलहरी’, ‘रणरंगम’, ‘वरणे अवश्यमुंड’, ‘मानडू’, ‘थल्लुमाला’ आणि ‘वर्षांगळक्कू शेषम’ यांसारख्या सिनेमांमध्ये दिसली आहे. मात्र, कल्याणीला खरी ओळख गेल्या वर्षीच्या रिलीज झालेल्या ‘लोका: चॅप्टर 1’ या सिनेमाने मिळवून दिली.
तिच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, कल्याणी भुवनेश अर्जुनन दिग्दर्शित ‘जिनी’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात रवी मोहन, वामिका गब्बी आणि कीर्ती शेट्टी हे कलाकारही आहेत. तसेच कल्याणी रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ सिनेमातही दिसणार असल्याची चर्चा आहे, मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.





