Tukaram Mundhe : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ महागात! 7 रेस्टॉरंट्सचे थेट परवाने निलंबित, FDA ची धडाकेबाज कारवाई
Tukaram Mundhe : याशिवाय, चार हॉटेल्सकडे अन्न व्यवसायासाठी आवश्यक परवानाच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेअंतर्गत नाशिकमध्ये मोठी धडक कारवाई करण्यात आली.
गेल्या दोन दिवसांत एफडीएच्या पथकाने शहरातील २० नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची अचानक तपासणी केली. या तपासणीत अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने ७ हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने तात्काळ रद्द करण्यात आले. (Tukaram Mundhe)
याशिवाय, चार हॉटेल्सकडे अन्न व्यवसायासाठी आवश्यक परवानाच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने याची दखल घेण्यात आली असून, कायदेशीर परवानगी मिळेपर्यंत या हॉटेल्सचा व्यवसाय तात्काळ बंद ठेवण्याचे आदेश एफडीएने दिले आहेत. (Tukaram Mundhe)
तपासात काय काय आढळलं (Tukaram Mundhe)
तपासणीदरम्यान अनेक हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात गंभीर अस्वच्छता आढळली. ग्राहकांसाठी तयार केलेले अन्न उघड्यावर ठेवले जात असल्याचे दिसून आले. तसेच कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक स्वच्छतेचे नियम पाळले जात नसल्याचे, तर कोल्ड स्टोरेज आणि तापमान नियंत्रणाच्या नियमांकडेही पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले. या निष्काळजीपणामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने एफडीएने कठोर कारवाई केली.
एफडीएने (FDA ) स्पष्ट केले आहे की, ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या हॉटेल्स आणि खाद्य व्यावसायिकांविरोधात आणखी कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे राज्यातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. (Tukaram Mundhe)
तुकाराम मुंढेंच्या आदेशाला आव्हान (Tukaram Mundhe)
दरम्यान, प्रतिबंधित खाद्यपदार्थांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याबाबत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी न्यायालयाने अन्न व औषध प्रशासन आणि गृह विभागासह संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावत तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. (Tukaram Mundhe)
हेही वाचा : TOP 10 News: मुसळधार पावसाचा इशारा ते आणखी एका मंदिरात देणगी चोरीचा आरोप; जाणून घ्या आजच्या Top 10 News





