Actress Rashmika Mandana : वाढदिवसादिवशी चाहत्यांना मोठं सरप्राईज! रश्मिका मंदानाचा ‘मैसा’मधील खतरनाक लूक रिव्हील
Actress Rashmika Mandana : रश्मिका मंदाना तिच्या आगामी राणाबली सिनेमामुळे चर्चेत असून तिच्या आणखी एका सिनेमाचे पोस्टर समोर आले आहे. या पोस्टरमधून रश्मिका खतरनाक लूकमध्ये पाहायला मिळत आहे.

Actress Rashmika Mandana : दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा आज आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी तिच्या चाहत्यांसाठी निर्मात्यांनी एक खास सरप्राईज देत तिच्या आगामी ‘मैसा’ सिनेमातील नवा लूक रिलीज केला आहे.
या नव्या पोस्टरमध्ये रश्मिका पूर्णपणे वेगळ्या आणि दमदार अवतारात दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर जखमा, धूळ आणि रक्ताचे डाग दिसत असून डोळ्यांत अंगार झळकत आहे. आतापर्यंतच्या तिच्या गोड आणि आकर्षक भूमिकांपेक्षा हा लूक पूर्णपणे वेगळा असून, या सिनेमातील तिची पडद्यावरील प्रतिमा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निर्मात्यांनी पोस्टर शेअर करताना खास कॅप्शनही दिले आहे. “तिने तिच्या तेजाने राज्य केले, मोहकतेने मने जिंकली… आता ती तिच्या आवेशाने सर्वांना थक्क करायला येत आहे. तिच्या आतापर्यंतच्या सर्वात दमदार अभिनयासाठी तयार व्हा” असे लिहिण्यात आले आहे. हा सिनेमा 24 डिसेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान, रश्मिका तिचा पती विजय देवरकोंडा याच्यासोबत ‘राणाबली’ या सिनेमातही दिसणार आहे. 11 सप्टेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणारा हा सिनेमा दोघांच्या लग्नानंतरचा पहिला एकत्रित प्रोजेक्ट असणार आहे. या सिनेमात रश्मिका ‘जयम्मा’च्या भूमिकेत झळकणार असून, दोघांनाही एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
रश्मिका मंदाना ही एक लोकप्रिय भारतीय अभिनेत्री आहे. जी प्रामुख्याने तेलुगू, कन्नड आणि हिंदी सिनेमांत काम करते. तिच्या क्यूट एक्सप्रेशन्स, स्क्रीन प्रेझेन्स आणि अभिनयामुळे ती दक्षिण भारताबरोबरच बॉलिवूडमध्येही प्रचंड लोकप्रिय झाली आहे. त्यामळेच तर तिला नॅशनल क्रश म्हटले जाते.





