KCL 2025 : जर्सी नंबर ७, शेवटच्या चेंडूवर विजयी षटकार, धोनीसारखा स्वॅग असणारा कोण आहे मुहम्मद आशिक? पाहा VIDEO

Muhammad Ashik Kochi Blue Tigers fiery all rounder : केरळ क्रिकेट लीगमध्ये (KCL) सध्या कोच्ची ब्लू टायगर्सचा एक खेळाडू सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हा खेळाडू आहे संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील कोच्ची ब्लू टायगर्सचा अष्टपैलू मुहम्मद आशिक. गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना हैराण करणारा आणि फलंदाजीने सामना खिशात घालणारा हा खेळाडू प्रत्येक सामन्यात आपली छाप सोडत आहे. विशेष म्हणजे त्याचा जर्सी नंबरही सात आहे आणि धोनीप्रमाणे विजयी षटकार मारण्याची शैली लक्ष वेधून घेत आहे.
रविवारी एरियस कोल्लम सेलर्सविरुद्धच्या सामन्यात आशिकने फक्त 18 चेंडूत नाबाद 45 धावांची खणखणीत खेळी करत कोच्चीला विजय मिळवून दिला. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 5 षटकार ठोकले, विशेषतः शेवटच्या चेंडूवर लगावलेल्या षटकाराने प्रतिस्पर्ध्यांचे मनोधैर्य खचले. चला, जाणून घेऊया कोण आहे हा मुहम्मद आशिक आणि का आहे तो इतका खास?
कोण आहे मुहम्मद आशिक?
From the jaws of defeat to the roar of victory! 🐯
The Kochi Blue Tigers pull off the highest chase in Federal Bank Kerala Cricket League history, and they seal it with a six off the last ball from Muhammad Ashik! Sanju Samson lit up the night with a blistering 121 off 51💥 pic.twitter.com/NYTskQWKK8
— Kerala Cricket League (@KCL_t20) August 24, 2025
मुहम्मद आशिक हा केरळचा अष्टपैलू खेळाडू आहे, जो सध्या कोच्ची ब्लू टायगर्सकडून खेळत आहे. उजव्या हाताचा फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज असलेला आशिक विकेट्स घेण्यासह कठीण प्रसंगी तुफानी फलंदाजी करण्यातही माहीर आहे. केरळ क्रिकेट लीगच्या पहिल्या सामन्यात अडानी त्रिवेंद्रम रॉयल्सविरुद्ध आशिकने गोलंदाजीने कहर केला. त्याने अवघ्या 13 धावांत 3 विकेट्स घेत कोच्चीला विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात एलिपी रिपल्सविरुद्धही त्याने 3 षटकांत फक्त 17 धावा देत 4 विकेट्स घेत आपली जादू दाखवली.
आशिकच्या तुफानी खेळीने वेधलं लक्ष –
केरळ क्रिकेट लीगच्या आठव्या सामन्यात आशिकने फलंदाजीने सर्वांना थक्क केले. 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या कोच्ची ब्लू टायगर्सला संजू सॅमसनने 51 चेंडूत 121 धावांची तुफानी खेळी करत दमदार सुरुवात करून दिली. पण संजू बाद झाल्यावर आणि कर्णधार सॅली सॅमसन अवघ्या 5 धावांवर बाद झाल्याने सामना अडचणीत आला. यावेळी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या मुहम्मद आशिकने 18 चेंडूत नाबाद 45 धावांची खेळी करत कोच्चीला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीत 3 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता, विशेषतः शेवटच्या चेंडूवर लगावलेला षटकार सामना जिंकवणारा ठरला.
हेही वाचा – Fareed Hussain Death : जम्मू-काश्मीरच्या क्रिकेटपटूचा रस्ते अपघातात मृत्यू, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
आयपीएल 2026 मध्ये दिसेल?
मुहम्मद आशिकने आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांमध्ये आपली छाप पाडली आहे. गोलंदाजीने विकेट्स आणि फलंदाजीने धावांचा पाऊस पाडणारा हा खेळाडू सध्या केरळ क्रिकेट लीगमधील सर्वात मोठा आकर्षण ठरत आहे. त्याच्या या कामगिरीवर आता आयपीएल संघांचेही लक्ष लागले आहे. जर हा खेळाडू आयपीएल 2026 मध्ये दिसला, तर आश्चर्य वाटायला नको!





