MSLTA : आयटीएफ टेनिस स्पर्धेस आजपासून प्रारंभ….

मुंबई – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने २५ हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून हि स्पर्धा आजपासून एमएसएलटीए टेनिस कोर्ट या ठिकाणी होणार आहे.
एमएसएलटीएचे सचिव व स्पर्धा संचालक सुंदर अय्यर यांनी सांगितले की, या पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत अव्वल टेनिसपटूनी आपला सहभाग नोंदवला असून सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना महत्वपूर्ण एटीपी गुण व पारितोषिक रक्कम मिळवण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेत डेव्हिसकूपर रामकुमार रामनाथन, मुकूंद ससीकुमार, आर्यन शहा, करण सिंग हे मानांकित खेळाडू मुख्य ड्रॉ मध्ये झुंजणार असल्याचे अय्यर यांनी नमूद केले. याशिवाय १७ वर्षीय पुरूष राष्ट्रीय विजेता रेथिन प्रणव, राष्ट्रीय उपविजेता नितिन कुमार सिन्हा, 15 वर्षीय मानस धामणे, सिद्धांत बांठीया यांना वाईल्ड कार्ड द्वारे मुख्य ड्रॉसाठी प्रदान करण्यात आले आहे.
Korea Masters 2024 (Badminton) : किरण जॉर्जची विजयी मोहीम उपांत्य फेरीत संपुष्टात….
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक व 50 एटीपी गुण, तर उपविजेत्या खेळाडूला करंडक व 30 एटीपी गुण देण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने 10 नोव्हेंबर व 11 नोव्हेंबर रोजी होणार असून मुख्य ड्रॉच्या फेरीचे सामने 12 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत. स्पर्धेसाठी नितीन कन्नमवार यांची आयटीएफ सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून मनोज वैद्य हे स्पर्धा संचालक म्हणून काम पाहणार आहेत.





