महावितरणचा आरटीओला झटका
MSEDCL hits RTO
Updated On:

पुणे -वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबाबत कायम प्रादेशिक परिवहन कार्यालय थकीत दंड वसूल करते. मात्र, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे 13 लाखांचे वीजबिल थकल्याने महावितरणने वीज तोडत “शॉक’ दिला आहे.
त्यामुळे काहीकाळ आरटीओमधील कामकाजावर परिणाम झाला. पुणे कार्यालयाचे 12 लाख 30 हजार रुपये थकीत वीजबिल आणि चालू बिलाची न भरलेली अशी एकूण रक्कम 13 लाख 50 हजारांच्या घरात पोहोचली होती.





