MS Dhoni : ‘थाला’ इतिहास रचण्यासाठी सज्ज! आयपीएलच्या १८ वर्षांत पहिल्यांदाच ‘हे’ घडणार

MS Dhoni to become first uncapped captain in IPL history : एमएस धोनी पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचे म्हणजेच आयपीएलचे नेतृत्व करताना दिसणार आहे. ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२५ मधून बाहेर पडल्यानंतर, सीएसके संघ पुन्हा धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळताना दिसणार आहे. या हंगामात संघाची कामगिरी आतापर्यंत काही खास नसली तरी, धोनीच्या नेतृत्वाखाली संघ पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर परतेल अशी अपेक्षा आहे. अशात धोनी आयपीएलमध्ये एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे.
धोनीने शेवटचे २०२३ च्या फायनलमध्ये सीएसकेचे केले होते नेतृत्व –
२०२३ च्या आयपीएल फायनलमध्ये एमएस धोनीने यापूर्वी त्याच्या संघाचे म्हणजेच सीएसकेचे नेतृत्व केले होते. २०२४ च्या सुरुवातीला संघाची कमान ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली होती, परंतु आता धोनी पुन्हा कर्णधार झाला आहे. आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी कधीही असे झाले नाही की अनकॅप्ड खेळाडू आयपीएल संघाचा कर्णधार बनला नाही.
STAR SPORTS POSTER FOR CAPTAIN MS DHONI 🐐 pic.twitter.com/4zpCVuEYUS
— Johns. (@CricCrazyJohns) April 11, 2025
मात्र, शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता एमएस धोनी जेव्हा टॉससाठी मैदानात उतरेल, तेव्हा ते पहिल्यांदाच असेल. त्यांचा सामना केकेआर संघाशी होईल, ज्याचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. अजिंक्य रहाणे देखील अनेक वर्षांपासून सीएसके संघाचा भाग आहे. २०२३ मध्ये, जेव्हा सीएसकेने आयपीएलचे जेतेपद जिंकले, तेव्हा रहाणे देखील चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत होता.
हेही वाचा – Virat Kohli : विराटने IPL 2025 दरम्यान घेतला मोठा निर्णय! तब्बल ३०० कोटींची ऑफर नाकारली
अशा प्रकारे धोनी बनला अनकॅप्ड खेळाडू –
आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी बीसीसीआयने एक नवीन नियम लागू केला होता. गेल्या पाच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या कोणत्याही खेळाडूला अनकॅप्ड खेळाडूच्या श्रेणीत ठेवण्यात येईल, असे सांगण्यात आले. धोनीने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१९ मध्ये खेळला, म्हणजेच त्याला पाच वर्षे झाली होती. त्यामुळे तो एक अनकॅप्ड खेळाडू बनला. यानंतर त्याला सीएसकेने अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवले. यावर्षीच्या आयपीएलमध्ये त्याचे मानधन ४ कोटी रुपये आहे. म्हणजेच, एकूणच, आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच, एक अनकॅप्ड खेळाडू आयपीएल संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.





