Virat Kohli : विराटने IPL 2025 दरम्यान घेतला मोठा निर्णय! तब्बल ३०० कोटींची ऑफर नाकारली

Virat Kohli ends 110 Crore Puma Deal and joins Agilitas as investor : आयपीएल २०२५ च्या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे की, टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने जर्मन स्पोर्ट्स ब्रँड पुमासोबतचा ११० कोटी रुपयांचा करार संपवला आहे. पुमाने विराट कोहलीला पुढील वर्षासाठी कायम ठेवण्यासाठी ३०० कोटी रुपयांची ऑफर दिली होती, तरीही विराटने ऑफर स्वीकारली नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विराट कोहली आता स्वदेशी ब्रँड अॅजिलिटासमध्ये गुंतवणूकदार म्हणून सामील झाला आहे. विराट कोहलीने २०१७ मध्ये पुमासोबत ८ वर्षांसाठी करार केला होता.
पुमा इंडियाने केली पुष्टी –
विराट कोहलीने करार संपवल्याची पुष्टी पुमा इंडियाने केली आहे. पुमा इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “पुमा विराटला त्याच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा देते. गेल्या काही वर्षांपासून त्याच्यासोबतचा हा एक अद्भुत बंध राहिला. एक क्रीडा ब्रँड म्हणून, पुमा पुढच्या पिढीतील खेळाडूंमध्ये सक्रियपणे गुंतवणूक करत राहील.”
PUMA wanted to retain Virat Kohli and offered him a deal worth 300cr for the next 8 years, but he didn't renew the contract. (TOI). pic.twitter.com/MxDfFowLe1
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 11, 2025
विराट दिली नाही कोणतीही प्रतिक्रिया –
Virat Kohli will end his 8-year contract worth 110cr with Puma India and join Agilitas Sports as its Brand Ambassador and will also hold equity in Agilitas Sports. (CNBC TV18). pic.twitter.com/afYe6DQ9Qg
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 7, 2024
दुसरीकडे, विराट कोहलीच्या व्यावसायिक हितसंबंधांची काळजी घेणारी सल्लागार कंपनी स्पोर्टिंग बियॉन्डने या प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत. कोहली आता अॅजिलिटास या स्पोर्ट्सवेअर कंपनीसोबत काम करत आहे, ज्याची स्थापना २०२३ मध्ये पुमा इंडिया आणि आग्नेय आशियाचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक गांगुली यांनी केली होती. ही कंपनी त्याच्या जीवनशैलीचा आणि अॅथलेटिक ब्रँड One8 चा विकास पुढे नेईल, जो कोहली जागतिक स्तरावर घेऊन जाऊ इच्छितो.
हेही वाचा – RCB vs DC : ‘हे माझं मैदान…’, केएल राहुलच्या ‘कांतारा’ सेलिब्रेशनने वेधलं सर्वांच लक्ष, VIDEO व्हायरल
२०२५ च्या आयपीएलमध्ये कोहलीची धमाल –
आयपीएल २०२५ मध्ये विराट कोहली चांगली कामगिरी करत आहे. आतापर्यंत ५ सामन्यांमध्ये कोहलीच्या बॅटमधून १८६ धावा झाल्या आहेत. ज्यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे, जरी काल दिल्ली कॅपिटल्ससोबत खेळलेल्या सामन्यात विराटला जास्त धावा करता आल्या नाहीत. या सामन्यात कोहलीच्या बॅटमधून १४ चेंडूत फक्त २२ धावा आल्या.





