MS Dhoni Limping : पहिल्या सामन्यापूर्वीच एमएस धोनीला दुखापत? सीएसकेच्या गोटात खळबळ अन् चाहत्यांची धाकधूक, पाहा VIDEO
MS Dhoni Limping : आयपीएल २०२६ पूर्वी धोनीच्या फिटनेसबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

MS Dhoni Limping Video Viral Ahead IPL 2026 : आयपीएलच्या १९व्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात आरसीबी आणि एसआरएच भिडणार असले, तरी खरी चर्चा रंगली आहे ती ३० मार्च रोजी होणाऱ्या सीएसकेच्या सामन्याची. मात्र, सीएसकेचा संघ मैदानावर उतरण्यापूर्वीच एमएस (MS Dhoni) धोनीचा एक सराव सत्रातील व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो लंगडत चालताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे धोनीच्या (Dhoni) गुडघ्याची जुनी दुखापत पुन्हा उफाळून आली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गुडघ्याच्या दुखापतीचा जुना ससेमिरा – MS Dhoni Limping
धोनी गेल्या काही वर्षांपासून गुडघ्याच्या समस्येशी झुंजत आहे. २०२३ च्या हंगामानंतर त्याने शस्त्रक्रिया (Surgery) देखील केली होती. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या क्लिपमध्ये सरावानंतर पॅव्हेलियनकडे जाताना धोनीला चालताना त्रास होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. धोनी आता ४४ वर्षांचा असून, या वयात यष्टिरक्षणासारखी कठीण जबाबदारी पेलणे त्याच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
View this post on Instagram
यष्टिरक्षणाची धुरा संजू सॅमसनकडे सोपवली जाणार – MS Dhoni Limping
ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद सोपवल्यानंतर धोनी आता केवळ एक खेळाडू म्हणून संघात आहे. जर धोनी पूर्णपणे तंदुरुस्त नसेल, तर चेन्नईकडे संजू सॅमसन सारखा दर्जेदार यष्टिरक्षक-फलंदाज उपलब्ध आहे. या लिलावात संजू चेन्नईच्या ताफ्यात दाखल झाल्याने, धोनी केवळ फलंदाजीवर लक्ष केंद्रित करून यष्टिरक्षणाची जबाबदारी संजूला सोपवू शकतो, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
‘इम्पैक्ट प्लेयर’ म्हणून दिसणार का?
धोनीच्या फिटनेसचा विचार करता, सीएसके व्यवस्थापन त्याला यंदा ‘इम्पॅक्ट प्लेयर’ (Impact Player) म्हणून खेळवण्याची शक्यता आहे. यामुळे त्याच्या गुडघ्यावर जास्त ताण येणार नाही आणि संघात त्याचे अस्तित्वही टिकून राहील. ३० मार्च रोजी गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात धोनीची नेमकी भूमिका काय असेल, हे स्पष्ट होईल. MS Dhoni Limping





