Arshdeep Girlfriend Post : ‘पैशांसाठी डेट करते?’ अर्शदीपबरोबरच्या नात्यावरून आरोप करणाऱ्यांना अभिनेत्री समरीनचे सडेतोड उत्तर; ट्रोलर्सची केली बोलती बंद
Arshdeep Girlfriend Post : मॉडेल समरीन कौरने एका इन्स्टा स्टोरीमधून पैसा आणि प्रसिद्धीसाठी अर्शदीप सिंगला डेट करत असल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

Arshdeep Singh Girlfriend Samreen Kaur Slams Trolls Over Relationship : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याची गर्लफ्रेंड आणि प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री समरीन कौर हिने सोशल मीडियावर आपल्या नात्यावरून विष ओकणाऱ्या ट्रोलर्सना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. केवळ प्रसिद्धी, प्रसिद्धीचा झोत आणि पैशांसाठी समरीन अर्शदीपला डेट करत असल्याचा आरोप काही नेटकऱ्यांनी केला होता. या विनाकारण होणाऱ्या टीकेवर दीर्घकाळ संयम बाळगल्यानंतर समरीनने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक सविस्तर आणि रोखठोक पोस्ट शेअर करत टीकाकारांचे कान उपटले आहेत.
‘लोकांचा दुटप्पीपणा उघड झाला’; समरीनने व्यक्त केला संताप
सोशल मीडियावरील लोकांच्या दुटप्पी वृत्तीवर बोट ठेवत समरीनने लिहिले, “मी या जगाकडे जितके जास्त पाहते, तितकाच लोकांचा दुटप्पीपणा स्पष्ट जाणवतो. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला जगापासून लपवून ठेवले, तर तुम्हाला त्याचा अभिमान नाही असे म्हटले जाते; आणि जर खुलेपणाने प्रेम व्यक्त केले, तर प्रसिद्धीसाठी हे सर्व स्टंट करत असल्याचा आरोप होतो. तुमची काही ठाम तत्त्वे असतील तर स्वार्थी ठरवले जाते. मनापासून खरे प्रेम केले तरी, एक दिवस तुम्ही त्याला सोडून द्याल’ असा जावईशोध लावला जातो.”
‘मी वयाच्या १७ व्या वर्षापासून कमावती’; खर्चावरून सुनावले खडे बोल
🚨 Samreen Kaur hits back at trolls accusing her of dating Arshdeep Singh for fame. The actor-model says she’s been financially independent since 17 and “doesn’t owe anyone an explanation.” Arshdeep backs her: “spread kindness.” 💬🏏
#samreenkaur #instantbollywood #gk https://t.co/d3GNPDjbUG
— InstantBollywood (@instantbolly) November 2, 2026
आर्थिक फायद्याच्या आरोपांना उत्तर देताना समरीन म्हणाली, “मी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षापासून स्वतःच्या पायावर उभी राहून काम करत आहे. आजवर २० पेक्षा जास्त देशांचा प्रवास केला असून स्वतःच्या मेहनतीवर माझे आयुष्य घडवले आहे. देवाच्या कृपेने माझी जीवनशैली सांभाळण्यासाठी आणि स्वतःचा सर्व खर्च उचलण्यासाठी मी पूर्णपणे सक्षम आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची अजिबात गरज नाही. अर्शदीपसारखा जोडीदार आयुष्यात मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान मानते. ज्यांना त्रास होतोय, त्यांनी माझे पेज अनफॉलो करावे.”
‘मला तुझा अभिमान आहे, जगा आणि जगू द्या!’; अर्शदीप मैदानात
🚨 Arshdeep Singh shows his support for his partner after she opened up about facing unnecessary criticism and negativity on social media. ❤️
“I’m proud of you baby. You are so strong… Spread love and let love find you.” 🫶
Arshdeep’s heartfelt message for his loved one is winning hearts. ❤️🥹
— HIMANI 🐥 (@himanii_68) November 1, 2026
समरीनच्या या धाडसी भूमिकेनंतर स्वतः अर्शदीप सिंग तिच्या समर्थनार्थ धावून आला. समरीनची ही पोस्ट आपल्या सोशल मीडिया हँडलवर रि-शेअर करत अर्शदीपने ट्रोलर्सची खरडपट्टी केली. “मला तुझा प्रचंड अभिमान आहे. तू खूप खंबीर आहेस,” असे म्हणत अर्शदीपने पुढे लिहिले, “आमच्या नात्याबद्दल विनाकारण चिंता करणाऱ्यांनी जरा ब्रेक घ्यावा; उगाच इतरांच्या आयुष्यात डोकावणे बंद करा. ‘जगा आणि जगू द्या!'”, असा सल्ला देत त्याने आपल्या गर्लफ्रेंडला पूर्ण पाठिंबा दर्शवला.





